ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन पाकिस्तानचा मुख्य प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाचा त्रास काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. तसेच आता 2024 च्या T20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. सध्या पाकिस्तान संघ नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. याआधी वॉटसन आणि पीसीबीच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती पण नंतर वॉटसनने पीसीबीची ऑफर नाकारली होती. त्यानंतर आता माजी दिग्गज क्रिकेटपटूने पाकिस्तान संघाचा कोच होण्यास नकार दिला आहे.
याबरोबरच, पाकिस्तनाचा संघ एकदिवसीय विश्वचषक 2023 पासून विना कोचचा खेळत आहे. तसेच मध्यतरी मोहम्मद हाफिजला संघाचे संचालक आणि प्रशिक्षक बनवले गेले असले तरी नंतर हाफिजनेही राजीनामा दिला होता. तेव्हा पासून पाकिस्तान संघाला कोचची गरज भासत आहे. अशातच वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने पाकिस्तान संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार दिला आहे.
You just said it's rumours so it rumours, I am contracted with the West Indies and we have World cup to win at home: Daren Sammy response on Pakistan Coaching role pic.twitter.com/YqrPpxi43r
— ٰImran Siddique (@imransiddique89) March 14, 2024
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन पाकिस्तान संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी जवळपास सज्ज झाला होता. याबाबत एसएल 2024 दरम्यान वॉटसन आणि पीसीबी अधिकाऱ्यांमध्ये याबाबत चर्चा देखील झाली होती. यावेळी वॉटसनने पीसीबीकडे 2 दशलक्ष डॉलर्सचे वेतन मिळत होते. आता बोर्ड 14 एप्रिलपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी देशांतर्गत प्रशिक्षकाची नियुक्ती करू शकते. पण त्याआधी वॉटसन नाराज झाला आणि त्याने पुन्हा पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार दिला होता. अशातच वॉटसन 22 मार्चपासून भारतात सुरू होणाऱ्या आयपीएल 2024 मध्ये समालोचन करताना पहायला मिळणार आहे.
Shane Watson has pulled out of the race to become Pakistan's Head Coach and decided to honor his current coaching and IPL commentary commitments. (Espncricinfo). pic.twitter.com/6GoOL1bl0Q
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 16, 2024
दरम्यान, वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने पीसीबीला सांगितले की, मर्यादित षटकांच्या संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून तो आधीच वेस्ट इंडिज बोर्डाशी करारबद्ध आहे. तर दुसरीकडे वॉटसन आपल्या प्रस्तावित पॅकेजमुळे नाराज असल्याची चर्चा पाकिस्तानी मीडियात आहे.
महत्वाच्या बातम्या –