रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं महिला प्रीमियर लीग 2024 चं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात आरसीबीनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीनं 18.3 षटकांत सर्वबाद 113 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, आरसीबीनं 2 गडी गमावून हे लक्ष्य गाठलं.
आरसीबीच्या विजयानंतर कर्णधार स्मृती मानधना बॉलिवूड संगीतकार पलाश मुच्छलसोबत दिसली. पलाशनं स्मृतीसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. स्मृती आणि पलाश याआधीही अनेक वेळा एकत्र दिसले आहेत. पलाशनं स्मृतीसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. फोटोमध्ये तो स्मृतीच्या खांद्यावर हात ठेवताना दिसत आहे. भारतीय क्रिकेट संघाची खेळाडू हरलीन देओलनं या फोटोवर कमेंट केली आहे. हरलीनसोबतच इतर क्रिकेटपटूंनीही या फोटोवर कमेंट केली.
View this post on Instagram
स्मृती मानधनाचं नाव गेल्या अनेक दिवसांपासून पलाशसोबत जोडलं जात आहे. पलाशनं लाइव्ह कॉन्सर्टमध्ये एक गाणं स्मृती साठी समर्पित केलं होतं. यासोबतच त्यानं आपल्या प्रेमाची कबुलीही दिली होती. मात्र, स्मृतीकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
महिला प्रीमियर लीग 2024 चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीनं 18.3 षटकांत 113 धावा केल्या. शेफाली वर्मानं 27 चेंडूत सर्वाधिक 44 धावा ठोकल्या. तर कर्णधार लॅनिंगनं 23 चेंडूत 23 धावांचं योगदान दिलं. आरसीबीकडून मराठमोळ्या श्रेयंका पाटीलनं 12 धावा देऊन 4 बळी घेतले. तर सोफी मोलिनेक्सनं 20 धावा देऊन 3 विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरात, 114 धावांचं लक्ष्य आरसीबीनं केवळ 2 गडी गमावून गाठलं. आरसीबीसाठी स्मृती मानधनानं 39 चेंडूंचा सामना करत 31 धावा केल्या. तिनं 3 चौकार मारले. एलिस पेरीनं 37 चेंडूंचा सामना करत नाबाद 35 धावा केल्या. तिनं 4 चौकार मारले. सोफिया डिव्हाईननं 32 धावांची खेळी केली. तर रिचा घोषनं नाबाद 17 धावा केल्या.
WPL 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीवर नजर टाकली तर आरसीबीची एलिस पेरी पहिल्या क्रमांकावर आहे. तिनं 9 सामन्यात 347 धावा केल्या. दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिनं 9 सामन्यात 331 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
चॅम्पियन बनल्यानंतर विजय माल्ल्यानं केलं आरसीबीचं अभिनंदन, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
भावा! सोशल मीडियावर सगळीकडे आरसीबीचीच हवा! ट्रॉफी उचलतानाच्या फोटोनं रचला नवा इतिहास
सीएसकेनं इलेक्टोरल बाँडद्वारे ‘या’ पक्षाला दिला 5 कोटी रुपयांचा निधी, अहवालात धक्कादायक माहिती उघड!