---Advertisement---

बीसीसीआयकडून भारतीय महिला संघासाठी केंद्रीय करार जाहीर, पाहा कोणती खेळाडू कोणत्या श्रेणीत

On: सोमवार, मार्च 24, 2025 1:24 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2024-25 हंगामासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या वार्षिक खेळाडू करारांची अधिकृत घोषणा केली आहे. हे करार 1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत लागू असतील.

2024-25 हंगामासाठी बीसीसीआयने वरिष्ठ भारतीय महिला क्रिकेट संघाच्या एकूण 16 खेळाडूंना केंद्रीय करार दिले आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना आणि अनुभवी अष्टपैलू दीप्ती शर्मा यांना ग्रेड ए करार मिळाला आहे.

ग्रेड बी मध्ये रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष आणि शेफाली वर्मा यांचा समावेश केला आहे. ग्रेड सी मध्ये एकूण नऊ मुलींनी केंद्रीय करार मिळवण्यात यश मिळवले. या इंडिया वुमन स्टार्समध्ये यास्तिका भाटिया, राधा यादव, श्रेयंका पाटील, तीतस साधू, अरुंधती रेड्डी, अमनजोत कौर, उमा छेत्री, स्नेह राणा आणि पूजा वस्त्रकार यांचा समावेश आहे.

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी दिलेल्या अधिकृत मीडिया रिलीजमध्ये असे म्हटले आहे की, “भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2024-25 हंगामासाठी (1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 टीम इंडिया (senior women) साठी वार्षिक खेळाडू करार जाहीर केले आहेत.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---