भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय यांनी यंदा आयपीएल प्ले ऑफ्समध्ये एक नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात केली होती. प्ले ऑफ्स व अंतिम सामन्यात जितके निर्धाव चेंडू टाकले जातील, त्या प्रत्येक चेंडूसाठी 50 झाडे लावण्याचा संकल्प त्यांनी केला होता. आता आयपीएल संपल्यानंतर चार महिन्यांनी हा संकल्प पूर्ण केला. देशातील विविध राज्यांमध्ये मिळून तब्बल एक लाख 47 हजार झाडे बीसीसीआयकडून लावली गेली.
https://twitter.com/MohanMu0134572/status/1707320595736899804?t=5Xe0YXtc_Uw-74lEAJSECg&s=19
बीसीसीआयने यावर्षी आयपीएल दरम्यान पर्यावरण पूरक आयपीएलची संकल्पना मांडलेली. त्यामुळे प्ले ऑफमध्ये प्रत्येक डॉट चेंडूवर शून्याच्या जागी झाडाचे चित्र दाखवले जात होते. प्ले ऑफ्स व व अंतिम फेरीत मिळून 294 डॉट चेंडू टाकले गेले होते. पहिल्या क्वालिफायरमध्ये 84, एलिमिनेटरमध्ये 96, दुसऱ्या क्वालिफायरमध्ये 68 व अंतिम सामन्यात 46 चेंडू डॉट फेकले गेलेले.
बीसीसीआयने ही 1,47,000 झाडे केरळ, कर्नाटक, आसाम व गुजरात येथे लावली. या झाडांचे संगोपन देखील बीसीसीआय करणार आहे.
तब्बल दोन वर्षानंतर यावेळी आयपीएल संपूर्णपणे भारतात आयोजित केली गेली होती. स्पर्धेच्या या सोळाव्या हंगामात दहा संघांनी सहभाग घेतलेला. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गतविजेत्या गुजरात टायटन्सला अखेरचा चेंडूवर पराभूत केले होते. यासोबत चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली.
(BCCI has planted 1,47,000 trees across 4 states – Kerala, Karnataka, Assam & Gujarat for the dot ball initiative during IPL)
हेही वाचा-
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! वर्ल्डकपपूर्वी ऐन मोक्याच्या क्षणी बाहेर झाला जबरदस्त खेळाडू, लगेच वाचा
अर्रर्र! बुमराहने 3 विकेट्स घेऊनही नावावर झाला लाजीरवाणा विक्रम, 6 वर्षांनंतर बूम बूमची खराब गोलंदाजी