---Advertisement---

आयपीएल 2023च्या हंगामासाठी नवा नियम, सामन्यात एका संघाचे 11 नाहीतर 15 खेळाडू होणार सहभागी

virat suryakumar
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नव्या हंगामासाठी नवा नियम लागू करणार आहे. ज्याला ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून ओळखले जाणार आहे. हा नियम बीसीसीआयने याआधी टी20 स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये वापरला. या नियमामुळे संघाला चालू सामन्यात त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्याही एका खेळाडूला बदलता येऊ शकते. संघ आणि खेळाडूंना या नियमाची सवय व्हावी यासाठी बोर्डाने आयपीएलपूर्वी राज्य क्रिकेटमध्ये हा नियम लागू केला आहे.

हा नियम फुटबॉल, बास्केटबॉल, रग्बी खेळांमध्ये वापरला जातो, मात्र आयपीएलमध्ये पहिल्यांदाच याचा वापर केला जाणार आहे. आयपीएलने त्याच्या ट्वीटरमार्फत याची माहिती शुक्रवारी (2 डिसेंबर) दिली. बोर्डानुसार, सामन्यादरम्यान संघ इम्पॅक्ट प्लेयर म्हणजेच प्रभाव खेळाडू नियमानुसार (Impact Player Rule) एका खेळाडूला सब्स्टीट्यूट म्हणून संघात आणू शकतात. यामुळे खेळाला एक नवीन रणनीतिक आणि धोरणात्मक परिमाण मिळेल.

https://twitter.com/IPL/status/1598591317340483585?s=20&t=RIziiwhky2qWYMi90ttRFQ

काय आहे ‘इम्पॅक्ट प्लेयर’नियम?
नाणेफेकीवेळी प्लेइंग इलेव्हनबरोबर कर्णधाराला 4 अशा खेळाडूंची नावे द्यावी लागतील, ज्यांपैकी एकाला तो सामन्यादरम्यान वापरू शकतो. या 4 पैकी फक्त एका खेळाडूला सब्स्टीट्यूट म्हणून वापरण्याचे बंधन आहे. जर संघ प्रथम फलंदाजी करताना झटपट आपल्या विकेट्स गमावत असेल, तर प्रभाव खेळाडू नियमाअंतर्गत ते प्लेइंग इलेव्हनमधील एखाद्या गोलंदाजाच्या (तळातील फलंदाज) जागी अतिरिक्त फलंदाज वापरू शकतात.

तो इम्पॅक्ट प्लेयर सामन्याच्या 14व्या षटकाच्या आधी संघातील कोणत्याही एका खेळाडूची जागा घेऊ शकतो. यासाठी संघाचे कर्णधार, मुख्य प्रशिक्षक यांना सामन्याचे अधिकारी आणि चौथ्या पंचांना याबाबत सांगावे लागणार आहे.

दुसरीकडे प्रथम फलंदाजी करताना जर संघाने जास्त विकेट्स गमावल्या नाहीत, तर दुसऱ्या डावात संघ एका फलंदाजाच्या जागी अतिरिक्त गोलंदाजाला सहभागी करू शकतो. मात्र सब्स्टीट्यूट खेळाडू आल्यानंतर त्याच्याजागी मैदान सोडावे लागणारा खेळाडू पुन्हा मैदानात उतरू शकत नाही.

ऑक्टोबरमध्ये खेळल्या गेलेल्या सय्यद अली मुश्ताक ट्रॉफीमध्ये दिल्लीचा ऋतिक शौकिन हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिला इम्पॅक्ट प्लेयर बनला. BCCI Introduces Impact Player Rule For IPL 2023

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नेमका तो गोल होता की नाही? जपानच्या ‘त्या’ वादग्रस्त गोलमुळे जर्मनी स्पर्धेबाहेर
ब्रेकिंग! ड्वेन ब्रावोची आयपीएलमधून निवृत्ती, पुढील हंगामासाठी घेतली ‘ही’ मोठी जबाबदारी खांद्यावर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---