---Advertisement---

BCCIमध्ये होणार महत्वाच्या पदासाठी भरती, वाचा कोण आणि असे करणार अर्ज?

On: मंगळवार, जानेवारी 16, 2024 11:37 AM
---Advertisement---

Invitation For the Selector’s Post : बीसीसीआयने सोमवारी (15 जानेवारी) दूपारी आपल्या सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली. बीसीसीआयने वरिष्ठ भारतीय संघाच्या सिलेक्टरच्या रिक्त जागेसाठी अर्ज मागवले आहेत. या पोस्ट मध्ये मात्र निवड समितीमधील कोणात्या जागेसाटी ही नियुक्ती होणार, याबद्दल काहीही सांगण्यात आले नाही. सध्या निवड समितीचे अध्यक्ष भारताचे माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर आहेत.

असे आहेत बीसीसीआयचे नियम
बीसीसीआयच्या नियमांनुसार नियम समितीमध्ये पाच झोन्स मधून( इस्ट, वेस्ट, नॉर्थ, साउथ आणि सेंट्रल) प्रत्येकी एक सदस्य असायला हवा. त्यातील ज्याने सर्वात जास्त कसोटी सामने खेळले असतील, त्याची अध्यक्ष म्हणून निवड होते. परंतु, कोणत्याही सदस्याचा कार्यकाळ 10 वर्षांपेक्षा जास्त होऊ नये. (कनिष्ठ आणि वरिष्ठ पॅनेल मिळून)

अशी आहे सध्याची समिती
बीसीसीआय निवड समितीत अजित आगरकर(Ajit Agarkar) यांच्या व्यतिरिक्त विविध झोनचे प्रतिनिधित्व करणारे निवडकर्ते आहेत. सेंट्रल झोनकडून शिवसुंदर दास हे आहेत. तर सुब्रत बॅनर्जी, श्रीधर शरत, सलील अंकोल आणि आगरकर अनुक्रमे इस्ट, साउथ आणि वेस्ट झोनचे प्रतिनिधित्व करतात. अजित आगरकरही वेस्ट झोनचेच आहेत. म्हणून यावेळी मात्र नॉर्थ झोनच्या सदस्याचा नंबर लागणार असल्याचे बोलले जात आहे.

या सोशल मिडिया पोस्ट नुसार इच्छुकांनी आपला अर्ज 25 जानेवारीच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत भरायचा आहे. यानंतर शॉर्टलिस्ट करून मुलाखत घेण्यात येईल.

वरिष्ठ निवडकर्ता बनवण्यासाठी खालीलपैकी एका अटीत बसने गरजेचे
1. किमात सात कसोटी सामनाे
2. 30 प्रथम श्रेणी सामने
3. 10 वनडे आणि 20 प्रथम श्रेणी सामने

महत्वाच्या बातम्या –
‘हा’ संघ झिंबाब्वे क्रिकेटचे भाग्य उजळवेल; कर्णधाराने केले संघाचे कौतुक
आफ्रिका क्रिकेटमध्ये मोठी खळबळ; डीन एल्गरला घ्यायची नव्हती निवृत्ती, प्रशिक्षकामुळे घ्यावा लागला निर्णय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---