भारतीय संघ सध्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ च्या तयारीत व्यस्त आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघात बरेचसे बदल झालेले पाहायला मिळू शकतात. भारताच्या कसोटी, वनडे आणि टी२० संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली टी२० स्वरुपातील नेतृत्तवपद सोडणार आहे. तर संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफ यांचा सुद्धा कार्यकाळ संपणार आहे. त्याच धर्तीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी (१७ ऑक्टोबर) अर्ज मागवले आहेत.
भारताच्या वरिष्ठ संघाचे मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक या पदांबरोबरच बीसीसीआयने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या सह क्रिडा विज्ञान आणि मेडिसिन विभागासाठीही अर्ज मागवले आहेत.
मुख्य प्रशिक्षकपदाच्या अर्जासाठी २६ ऑक्टोबर ही शेवटची तारिख असेल. तर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक पदांच्या अर्जासाठी ३ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. एनसीएच्या सह क्रिडा विज्ञान आणि मेडिसिन विभाग प्रमुखासाठीही ३ नोव्हेंबर हीच अर्ज करण्याची शेवटची तारिख दिली गेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानला ना रोहित ना विराटची भिती; कर्णधार आझम म्हणाला, ‘या’ मातब्बर फलंदाजासाठी करतोय तयारी
सुट्टी नाय..! ‘भारताविरुद्ध पराभव झाल्यास घरी येऊ देणार नाही…’, पाकिस्तानच्या कर्णधाराला धमकी