भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयला क्रिकेटविश्वातील सर्वात श्रीमंत आणि ताकदवान बोर्डांपैकी एक मानले जाते. आपला निर्णय मजबूतीने इतर बोर्डांपुढे मांडणे आणि त्यासाठी सर्वांची संमती घेणे बीसीसीआयला चांगले जमते. परंतु याच गोष्टीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल (आयसीसी) आणि बीसीसीआयमध्ये कधीकधी वाद निर्माण झाल्याचे दिसून येते.
आता पुन्हा एकदा आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यात एका निर्णयाबद्दल असहमती असल्याचे दिसून येत आहे. हे प्रकरण २०२३ नंतर पुढील ८ वर्षे होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनाशी संबंधित आहे.
बीसीसीआय २०२३ पासून ते २०३१ पर्यंतच्या कालावधीतील क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनाची आराखडा तयार करत आहे. अशात आयसीसीने त्यांच्यापुढे जागतिक स्पर्धांच्या आयोजनासाठी बोली आमंत्रित करण्याची अट ठेवली आहे. मात्र बीसीसीआयने याला विरोध दर्शवला आहे.
गुरुवारी (२५ फेब्रुवारी) पार पडलेल्या आयसीसीच्या बैठकीदरम्यान बीसीसीआयने स्पष्ट केले की, ते एका जागतिक संस्थेकडून बोली आमंत्रित करण्याच्या आणि संभाव्य यजमान देशाकडून निधी मागण्याच्या कल्पनेच्या पूर्णपणे विरोधात आहेत.
याविषयी माहिती देताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी नुकत्याच झालेल्या बोर्डांच्या बैठकीमध्ये पुढील आयोजन चक्रासाठी बोली आमंत्रित करण्याच्या कल्पनेला संमती दिलेली नाही. परंतु आम्हाला विश्वास आहे की इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड सोबत क्रिकेट ऑस्ट्रेलिया आम्हाला पुरेपूर सहकार्य करेल.”
जागतिक संस्थेकडून बोली आमंत्रित करण्याच्या कल्पनेला आयसीसीचे मुख्य कार्यकारी मनु साहनी यांनी समर्थन दिले आहे. यासाठी पाकिस्तान आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डांनीही होकार दिला आहे. याबरोबरच ओमान आणि इमिरेट्स, मलेशिया आणि सिंगापुर अशा छोट्या बोर्डांनीही सहकार्य करण्याचे ठरवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एका वर्षापुर्वी भारतीय संघातील स्थान नव्हते पक्के, आज तोच बनलाय सर्वात मोठा ‘मॅच विनर’
आठवणीतील १९८७ विश्वचषक : विवियन रिचर्ड्स यांनी कराचीतील मैदानावर आणले होते तुफान