भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने गुरुवार (15 एप्रिल) रोजी भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या वार्षिक मानधन कराराची यादी जाहीर केली. बीसीसीआयने जाहीर केलेली ही यादी ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021 पर्यंत लागू असणार आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या यादीत अव्वल स्थानी ग्रेड ए+ असून यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसह आणखी 2 खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. तसेच या यादीत नवख्या युवा खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. परंतु चमकदार कामगिरी करणाऱ्या टी. नटराजनला या यादीतून वगळण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या टी नटराजनने क्रिकेट चाहत्यांना मोठ्या प्रमाणात प्रभावित केले होतो. परंतु या मोसमात त्याने केवळ 1 कसोटी, 2 एकदिवसीय आणि 4 टी-20 सामने खेळले आहेत. त्यामुळे बीसीसीआयने जाहीर केलेल्या निर्धारित मानधनाच्या यादीत त्याला सहभागी केले नाही.
कारण बीसीसीआयच्या नियमानुसार, एका सत्रात एका खेळाडूने कमीतकमी तीन कसोटी किंवा आठ एकदिवसीय किंवा दहा टी -20 सामने खेळणे आवश्यक असते. या तिनही क्रिकेट स्वरुपात टी नटराजन खेळला आहे, परंतु यामध्ये त्याने एकाही स्वरूपातील अट पुर्ण केली नाही. त्यामुळे बीसीसीआयने त्याला या वार्षिक मानधनाच्या करारापासून दूर ठेवले असून त्याचबरोबर मनीष पांडेलाही त्यांनी वार्षिक करारामधून बाहेरचा रस्ता दाखविला आहे. परंतु मोहम्मद सिराज आणि शुभमन गिल यांसारखे नवखे खेळाडू या करारात स्थान मिळविण्यात यशस्वी झाले आहेत.
बीसीसीआयने जाहीर केलेल्या खेळाडूंची यादी :
ग्रेड ए+ : विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह
ग्रेड ए : रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रिषभ पंत आणि हार्दिक पांड्या
ग्रेड बी : रिद्धिमान साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर आणि मयंक अग्रवाल
ग्रेड सी : कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या-
खुशखबर! पुन्हा रंगणार भारत-पाकिस्तान ‘हाई वोल्टेज’ सामन्यांचा थरार, पाहा कधी आणि कोठे होणार मॅच
CSKvPBKS: दीपक चहरच्या ‘क्लास’ प्रदर्शनाची बहिण मालतीने केली स्तुती, म्हणाली…