चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत आपला पहिला विजय मिळवला आहे. शुक्रवारी (१६ एप्रिल) झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने पंजाब किंग्ज संघाला ६ गडी राखून पराभूत केले आहे. या विजयात दीपक चहरचा मोलाचा वाटा आहे. दीपक चहरने सुरुवातीलाच पंजाब किंग्ज संघाच्या महत्वाच्या फलंदाजांना माघारी धाडले होते. या विजयानंतर चहरच्या बहिणीने ट्विट करत त्याचे कौतुक केले आहे.
दीपक चहरने या सामन्यात ४ षटक गोलंदाजी करून अवघ्या १३ धावा खर्च केल्या होत्या. यात त्याला ४ गडी बाद करण्यात यश आले होते. यामध्ये मयंक अगरवाल, ख्रिस गेल, निकोलस पुरन आणि दीपक हुड्डा यांचा समावेश होता. सामन्यानंतर दीपक चहरची बहिण मालती चहरने ट्विट करत लिहिले की, ‘अप्रतिम गोलंदाजी, मला तुमच्यावर अभिमान आहे भाई… मुख्यतः यामुळे की तुम्ही थाला एमएस धोनीला चेन्नईसाठी २०० वा सामना जिंकवून देण्यात मोलाची भुमिका बजावली.’
https://twitter.com/ChaharMalti/status/1383099919670579200?s=20
तसेच मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने शेवटच्या षटकांमध्ये सामना आपल्या बाजूने वळवला होता. या सामन्यात फिरकी गोलंदाज, राहुल चहरने मोलाची भूमिका बजावली होती. त्याने ४ षटकात २७ धावा देत ४ महत्वाचे गडी बाद केले होते. याबद्दल मालतीने आणखी एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये तिने दीपक चहर आणि राहुल चहर यांचे फोटोज् शेअर केले होते आणि लिहिले आहे की,” चहर ब्रदर्स पॉवर, मला तुमच्यावर अभिमान आहे.”
https://twitter.com/ChaharMalti/status/1383102553194442755?s=20
चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर १०६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून मोईन अलीने ४६ धावांची खेळी केली. तसेच फाफ डू प्लेसीने नाबाद ३६ धावांची खेळी केली होती. हा सामना चेन्नई सुपर किंग्ज संघाने ६ गडी आणि २६ चेंडू शिल्लक असताना आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटपटू कम गुरू! सामन्यानंतर शाहरुखने घेतली धोनीची भेट; चाहते म्हणाले, ‘मास्टर माही’
‘वडिलांचा पैसा वाया घालवतेस,’ म्हणणाऱ्या महिलेची सचिनच्या लेकीने ‘अशी’ केली बोलती बंद
जड्डूच्या लक्षणीय क्षेत्ररक्षणाचा चाहर बनला चाहता; म्हणाला, ‘मला मैदानावर असे ११ जडेजा पाहिजेत’






