आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. मागच्या हंगामात कोरोना विषाणूमुळे संपूर्ण आयपीएल प्रभावित झाली होती. त्यामुळेच बीसीसीआयने या हंगामातील सर्व साखळी सामने मुंबई आणि पुणे स्थित चार स्टेडियमवर आयोजित केले आहेत, जेणेकरून कोरोना संक्रमणाची शक्यता कमी असेल. या हंगामात आयपीएलच्या सुरुवातीला महाराष्ट्र सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर बीसीसीआयने २५ टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी दिली आहे. परंतु, लवकरच स्टेडियमधील प्रेक्षकांची संख्या वाढवली जाऊ शकते.
देशातील कोरोनाची स्थिती पहिल्यापेक्षा खूप सुधारली आहे. एक दिवसापूर्वी देशात १२५९ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तसेच ३५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेपेक्षा ही रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे. याच पार्श्वभूमीवर मैदानात येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढवली जाण्याची शक्यता आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार बीसीसीआयकडून लवकरच आयपीएलच्या राहिलेल्या सामन्यांसाठी स्टेडियममध्ये ७० टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली जाऊ शकते. यासंदर्भात बीसीसीआयकडून लवकरच अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. याच कारणास्तव सर्व सामन्यांची तिकिट बुकिंगही सुरू केली गेली नाही. ज्या सामन्यांची बुकिंग सुरू आहे, त्यापैकी बऱ्याच सामन्यांचे सर्व तिकिट्स बूक झाले आहेत.
जर बीसीसीआयकडून ७० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी दिली केली, तर ही चाहत्यांसाठी आनंदीची गोष्ट असेल. कारण मागच्या दोन वर्षांपासून चाहते स्टेडियममध्ये जाऊन सामन्याचा आनंद घेऊ शकलेले नाहीत. आयपीएल २०२० चा संपूर्ण हंगाम यूएईमध्ये खेळला गेला होता. त्यानंतर मागचा हंगाम भारतात आयोजित केला होता, पण खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाली आणि स्पर्धातील दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळवला गेला होता.
आयपीएल २०२२ चे पाच सामने आतापर्यंत खेळले गेले आहेत आणि यामध्ये ज्या संघाने नाणेफेक जिंकली, तो संघ फायद्यात राहिल्याचे दिसले. आतापर्यंतच्या ५ सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रात्रीच्या वेळी वातावरणात दव जाणवत आहे आणि त्यामुळे नंतर गोलंदाजीसाठी अधिक अडचण निर्माण होत आहे. आता हंगाम जसजसा पुढे जाईल, तशी परिस्थितीही बदलू शकते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Video: सामना हैदराबादचा, पण चर्चा मालकिणीची! काव्या मारनच्या आदांनी वेधले सर्वांचेच लक्ष
संजू सॅमसनने पुण्यात पाडला षटकारांचा पाऊस, अवघ्या २५ चेंडूत झळकावले अर्धशतक, पाहा Video
लाराने २२ वर्षांपुर्वी चौथ्या डावात अशी काही फलंदाजी केली की सगळं जग लाराचा झालं फॅन