बीसीसीआय (BCCI) आयपीएल २०२२ (IPL 2022) संदर्भात सर्व संघांसोबत आयोजनबद्दलच्या दुसऱ्या योजनेबद्दल बोलण्यासाठी बैठक बोलावण्याची शक्यता आहे. भारत सध्या ओमिक्रोनच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने बीसीसीआयच्या चिंतेत वाढ होत चाललीये. बीसीसीआयला कोव्हिडची एप्रिल/मे मधली परिस्थिती कशी असेल याचा अंदाज येत नाही. एका अहवालानुसार, बीसीसीआयने सर्व संघमालकांसोबत बैठक करून सगळे मुद्दे आणि परिस्थितीबद्दल चर्चा केली पाहिजे. तसेच बीसीसीआय यावेळी आयपीएलचं आयोजन युएईमध्ये (IPL in UAE) करण्यास उत्सुक नाही.
अहवालांनुसार, बीसीसीआय लीगची सुरुवात २ एप्रिलपासून चेन्नईमध्ये सुरु करण्याचा विचार करत आहे. देशात कोव्हिडची स्थिती जर बिघडली नाही तर आयपीएल सामने आधीसारखे सगळ्या संघाच्या घरी आणि दुसऱ्या स्टेडियमवर खेळवण्यात येतील. मात्र, परिस्थिती बिघडली तर दुसऱ्या योजनेचा विचार करावा लागणार. मागच्या वर्षी काही योजना नसल्याने लीगला मध्ये थांबवावे लागले आणि नंतर युएईमध्ये सामने खेळवण्यात आले.
मुंबई-पुण्यात सामने भरवण्याचा होऊ शकतो विचार
बीसीसीआय मुंबई, पुणे नाहीतर गुजरातमध्ये सामने खेळवण्याचा विचार करत आहे. एका क्रिकेट संकेतस्थळाने त्यांच्या अहवालात सांगितले, “ही बैठक तर आयपीएलच्या नवीन संघ लखनऊ आणि अहमदाबाद यांना बीसीसीआयच्या कामकाजाचा परिचय करून देण्यासाठी आहे. मात्र, कोव्हिड प्रादुर्भावामुळे पूर्ण स्पर्धा मुंबई आणि पुणेमध्ये नाहीतर अहमदाबाद, वडोदरा आणि राजकोटमध्ये खेळवण्यात येण्याचा विचार होऊ शकतो. बैठकीत संघमालकांना सुध्दा दुसऱ्या योजनेबद्दल सांगण्याचं लक्ष्य आहे.
संघाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की बीसीसीआय मागच्या वेळेसारखी स्पर्धा यूएईमध्ये खेळवण्यात उत्सुक नाही आहे.
मध्येच स्थगित झाली स्पर्धा
आयपीएल २०२० (IPL 2020) यूएईमध्ये खेळवण्यात आली होती. तर आयपीएल २०२१ (IPL 2021) चे आयोजन भारतात करण्यात आलेलं. पण, अचानक आलेल्या कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेचा फटका आयपीएलच्या संघांना पण बसला आणि कोव्हिड आयपीएलच्या जैव सुरक्षित वातावरणात सुद्धा शिरला. यामुळे स्पर्धा मध्येच स्थगित केली आणि सप्टेंबरमध्ये आयपीएलचे उरलेले सामने खेळवण्यात गेले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या आयुष्यातील माहीत नसलेल्या ४ गोष्टी
‘या’ दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांपासून टीम इंडियाला असेल धोका, माजी भारतीय दिग्गजाने केले सावध
आयपीएल २०२२ पूर्वी सनरायझर्सची मोठी घोषणा; तब्बल ६ दिग्गजांचा सपोर्ट स्टाफमध्ये समावेश