---Advertisement---

रणजी ट्रॉफी न खेळणं पडलं महागात! ईशान किशन आणि श्रेयस अय्यरकडे BCCI करणार कायमचं दुर्लक्ष

Ishan Kishan
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने सर्व खेळाडूंना रणजी ट्रॉफी खेळण्याच्या सुचना केल्या होत्या. पण तराही ईशान किशन आणि श्रेयस अय्यर असे काही खेळाडू रणजी हंगामात खेळले नाही. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआय मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना ही चूक महाताक पडण्याची दाट शक्यता सध्या निर्माण झाली आहे.

ईशान किसन (Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हे दोन्ही खेळाडू मागच्या काही वर्षांपासून भारतीय संघासाठी महत्वाचे राहिले आहेत. पण तरी आगामी हंगामासाठी त्यांना बीसीसीआयचा केंद्रीय करार मिळाला नाही, तर नवाल वाटायला नको. बीसीसीआयने जर हा निर्णय घेतला, तर यासाटी ईशान आणि श्रेयस स्वतः जबाबदार असू शकतात. हे दोन्ही खेळाडू रणजी ट्रॉफी 2024 मध्ये खेळतील, अशी अपेक्षा बीसीसीआयसह सर्वांना होती. खासकरून बीसीसीआयने सुचना केल्यानंतर त्यांनी रणजी ट्रॉफी खेळणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. या दोघांनी रणजी ट्रॉफीपेक्षा इंडियन प्रीमियर लीगला अधिक महत्व दिल्याचे बोलले जात आहे.

सूत्राच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने सांगितले आहे की, “अजित आगरकर यांच्या नेतृत्वात निवडकर्त्यांनी 2023-24 हंगामासाठी केंद्रीय कराराबद्ध खेळाडूंची यादी जवळपास निश्चित केली आहे. बीसीसीआयकडून लवकरच ही यादी घोषित केली जाईल. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना या यादीतून बाहेर केले जाऊ शकते. कारण दोघांनी बीसीसीआयच्या आदेशानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळले नाहीये.”

दरम्यान, ईशानला बीसीसीआयकडून 2023 मध्ये सी ग्रेडचा करार मिळाला होता. यासाठी त्याला वर्षाला एक कोटी रुपये बीसीसीआयकडून मिळाले. तर दुसरीकडे श्रेयस अय्यर ग्रेड बी मधील खेळा होता. 2023 मधये ग्रेड बी खेळाडूंना 3 कोटी रुपये वर्षीक मिळत होते. पण आगामी हंगामात या दोघांना बोर्डाकडून केंद्रीय करार मिळण्याची शक्यात फारच कमी आहे.

डिसेंबर 2023 मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होता. ईशानने या दौऱ्यात मानसिक थकवा आल्याचे कारण देत माघार घेतली होती. त्यानंतर अद्याप त्याने संघात पुमरागमन केले नाही. काही दिवसांपूर्वी हार्दिक पंड्या याच्यासोबत ईशान आयपीएलसाठी सराव करताना दिसला. दुसरीकडे श्रेयस अय्यर याने दुखापतीचे कारण देत रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यातून माघार घेतली.
इंग्लंडविरुद्ध मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळल्यानंतने त्याने पाठीच्या दुखापतीचे कारण सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर मालिलकेतील शेवटच्या तीन सामन्यासाठी त्याला संघातून वगळण्यात आले. (BCCI may release Ishan Kishan and Shreyas Iyer from central contracts)

महत्वाच्या बातम्या – 
‘त्याला पाहिजे तितकं श्रेय मिळालं नाही…’, कोणत्या भारतीय खेळाडूविषयी बोलला एबी डिविलियर्स
वडील आणि भावाच्या निधन, तीन वर्षांचा ब्रेक आणि नंतर कसोटी पदार्पण; खडतर होता आकाशचा इथपर्यंतचा प्रवास

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---