भारतीय क्रिकेट नियमक मंडळाची (बीसीसीआय) वार्षिक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा झाली. आगामी देशांतर्गत हंगाम तसेच इतर करार हे या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे होते. त्याचवेळी भारतीय पंचांसाठी देखील एक नवी योजना आखली गेली. ज्यामध्ये पंचांची वर्गवारी करणे व त्यांच्या वेतनात वाढ करणे हे निर्णय घेतले गेले.
नवी श्रेणी केली समाविष्ट
बीसीसीआयने पंचांसाठी A+ श्रेणी सुरू केली आहे. आयसीसी एलिट पॅनेलचे सदस्य नितीन मेनन हे त्या दहा पंचांपैकी एक आहेत आहेत, ज्यांना पंचांच्या नव्या A+ श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यांच्या व्यतिरिक्त इतर चार आंतरराष्ट्रीय पंचांचादेखील या श्रेणीत समावेश केला गेला आहे. त्यात अनिल चौधरी, मदनगोपाल जयरामन, वीरेंद्र शर्मा आणि केएन अनंतपद्मनाभन यांची नावे आहेत. रोहन पंडित, निखिल पटवर्धन, सदाशिव अय्यर, उल्हास गंधे आणि नवदीप सिंग सिद्धू हे देखील A+ श्रेणीचा भाग आहेत.
यासोबतच अ गटात अनुभवी सी शमशुद्दीन यांच्यासह 20 पंच आहेत. गट ब मध्ये ६० पंच, गट क मध्ये ४६ आणि गट ड मध्ये ११ पंच आहेत. ड गटातील पंच ६० ते ६५ वयोगटातील आहेत. माजी आंतरराष्ट्रीय पंच हरिहरन, सुधीर असनानी, अमिश साहेबा तसेच बीसीसीआय पंच उपसमितीच्या सदस्यांनी केलेल्या निवडीनंतर गुरुवारी विषयाच्या बैठकीत संपूर्ण यादी सादर करण्यात आली.
मिळणार इतके वेतन
A+ आणि A श्रेणीतील पंचांना प्रथमश्रेणी सामन्यांसाठी प्रतिदिन ४०,००० रुपये मानधन दिले जाईल. तर ब आणि क श्रेणीतील पंचांना प्रतिदिन ३०,००० रुपये दिले जातील. २०१८ पासून बोर्डाने आपल्या पंचांच्या यादीत कोणाचाही समावेश केलेला नाही. बीसीसीआयने कोविड-१९ चा धोका कमी झाल्यानंतर २०२२-२०२३ मध्ये दोन वर्षांनी संपूर्ण देशांतर्गत हंगाम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये १८३२ सामन्यांचे आयोजन करण्याचे बीसीसीआयचे नियोजन आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
WIvIND: काट्याच्या लढतीत टीम इंडियाचा विजयाने श्रीगणेशा; वेस्ट इंडिज अवघ्या ३ धावांनी पराभूत
वेस्ट इंडीजविरुद्धच्या लाईव्ह सामन्यात कर्णधार धवनने केले ‘हे’ कृत्य, समालोचकांच्याही बत्त्या गुल
ही कसली व्यथा! कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला संघ सज्ज, पण व्हिसा वाढवतंय टेन्शन