नव्या वर्षात भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (BCCI) अनेक बदलांची तयारी केली जात आहे. ज्यासाठी बोर्डाने नुकतेच 12 जानेवारीला मुंबईत विशेष सभेचं आयोजन केलं आहे. या बैठकीत बीसीसीआयच्या भविष्याबाबत अनेक मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय या सभेत हेड कोच गाैतम गंभीरच्या कामगिरीवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बैठकीत गौतम गंभीर आणि त्याच्या सपोर्ट स्टाफच्या कामगिरीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. हा प्राथमिक मुद्दा नसला तरी अलीकडची कामगिरी पाहता गंभीरच्या कोचिंगबाबत बोर्डातील काही सदस्यांमध्ये असंतोष वाढत आहे. यंदाच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1-3 ने पराभव झाल्याने टीम इंडिया गंभीर संकटात सापडली आहे. संघाच्या सुमार कामगिरीमुळे हेड कोच गंभीरकडे बोट दाखवले जात आहे.
गौतम गंभीरसाठी सर्वात मोठे संकट म्हणजे आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 त्याच्या कार्यकाळातील टर्निंग पॉइंट ठरू शकते. या स्पर्धेत भारत उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही, तर त्यांच्या कोचिंगवर मोठे प्रश्न उपस्थित होण्याची खात्री आहे. अश्या स्थितीत गौतम गंभीरला कमबॅक करण्यासाठी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी शेवटची संधी असणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत सुद्धा अपेक्षेप्रमाणे टीम इंडियाकडून कामगिरी झालेली नाही. याच दरम्यान भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये एकी नाहीये अशा बातम्या समोर येत होत्या. त्यामुळे आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघाच्या कामगिरीवर गाैतम गंभीरचं भविष्य अवलंबून आहे. असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.
गौतम गंभीरनं सप्टेंबर 2024 मध्ये मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी हाती घेतली. त्यावेळी टीम इंडिया टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर शिखरावर होती. शिवाय यावेळी भारत कसोटी आणि वनडेमध्येही मजबूत स्थितीत होता. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने बांग्लादेशला कसोटीत 2-0 ने पराभूत केले. मात्र यानंतर संघाची कामगिरी कमकुवत होत गेली. भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेकडून पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत भारताला 0-3 ने पराभव पत्करावा लागला. तर आता बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्येही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.
हेही वाचा-
गिल ‘ओव्हररेटेड’ खेळाडू, त्याच्या जागी ऋतुराज….’, माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाच्या ‘प्रिन्स’ला सुनावले
नशीब चमकलं..! ‘टी20’ आणि ‘कसोटी’नंतर या खेळाडूला ‘वनडे’ संघामध्येही मिळणार स्थान
खराब फॉर्ममधून जाणाऱ्या विराट-रोहितला युवराज सिंगची साथ, म्हणाला ‘माझ्यासाठी कुटुंबासारखे….