भारतात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेदिवस वाढत आहेत, तर दुसरीकडे आयपीएल २०२२ (IPL 2022) विषयी चाहत्यांची उत्सुकता देखील वाढत चालली आहे. यावर्षी आयपीएलमध्ये लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन फ्रेंचायझी सहभागी होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मेगा लिलाव (IPL 2021 Mega Auction) देखील आयोजित केला जाणार आहे. हा लिलाव केव्हा आणि कधी होणार याविषयी अद्याव कसलीही अधिकृत माहिती दिली गेली नाही. पण, आता बीसीसीआय शनिवारी (२२ जानेवारी) सर्व फ्रेंचायझींसोबत महत्वाची बैठक घेणार आहे, ज्यामध्ये मेगा लिलाव आणि स्पर्धेच्या आयोजनाविषयी महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.
क्रिकबज वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी होणाऱ्या या बैठकीत आयपीएल सामने कोणत्या शहरांमध्ये खेळले जातील याविषयी फ्रेंचायझींसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. आयपीएलचा आगामी १५ वा हंगाम २ एप्रिलला सुरू होणार आहे, परंतु सामने खेळण्यासाठी शहरे मात्र अद्याप ठरलेली नाहीत. तसेच आगामी हंगाम भारतात खेळला जाईल की विदेशात, याविषयी देखील या बैठकीत स्पष्टता येईल.
मिळालेल्या माहितीनुसार बोर्ड फ्रेंचायझींना विश्वास देऊ इच्छित आहे की, स्पर्धा भारतात खेळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला जात आहेत. जर स्पर्धेतील सामने काही शहरांपुरते मर्यादित ठेवायचे असतील, तर मुंबई आणि पुणे या दोन शहरांची निवड होऊ शकते. माध्यमांमध्ये अशीही माहिती समोर आली होती की, दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंका देखील पर्यायी ठिकाणे म्हणून शर्यतीत आहेत.
बैठकीत मेगा लिलाव देखील एक मोठा मुद्दा असेल. याविषयी बोर्ड सर्व फ्रेंचायझींसोबत चर्चा करून निर्णय घेईल. असे सांगितले जात होते की १२ आणि १३ फेब्रुवारीला लिलाव बंगळुरूमध्ये होणार आहे. पण बंगळुरूमधील लिलावाच्या आयोजनावर संभ्रम आहे. वृत्तानुसारा मेगा लिलाव बंगळुरूऐवजी मुंबईत आयोजित केला जाऊ शकतो आणि याविषयी बैठकीत सविस्तर चर्चा होईल.
बैठकीपूर्वी लखनऊ – अहमदाबाद फ्रेंचायझींचे रिटेन खेळाडू घोषित
दरम्यान, लखनऊ आणि अहमदाबाद संघाला तीन खेळाडूंना संघात रिटेन करण्याची संधी दिली गेली आहे. या दोन्ही संघांना २२ जानेवारीपर्यंत त्यांनी रिटेने केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे द्यायची आहे. लखनऊने कर्णधारपदासाठी केएल राहुलला निवडले आहे, तसेच मार्कस स्टॉयनिस आणि रवि बिश्नोई यांनी लखनऊने संघात रिटेन केले आहे. तसेच अहमदाबादने हार्दिक पंड्या, राशिद खान आणि शुभमन गिल या तिघांना त्यांनी रिटेन केले आहे. हार्दिक पांड्या अहमदाबादचा कर्णधार असणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएलमधील अहमदाबाद संघाचे काय असेल नाव ? महत्वाची माहिती आली समोर
गतविजेत्या बंगालची युपीसमोर शरणागती!
शतकांचा नाही पण सचिनचा शुन्यावर आऊट होण्याचा रेकाॅर्ड विराट लवकरच मोडेल; पाहा यादीतील स्थान
व्हिडिओ पाहा –