भारतीय क्रिकेट मंडळाने पुढील दोन वर्षांसाठी ऑल इंडिया रेडिओसोबत क्रिकेटच्या रेडिओ ब्राॅडकास्टसाठी करार केला आहे. हा करार पुढील दोन वर्षांसाठी असणार आहे.
यामुळे देशातील क्रिकेटप्रेमींना आकाशवाणीच्या माध्यमातून क्रिकेटच्या समालोचनचा आनंद घेता येणार आहे.
याची सुरुवात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेतील पहिल्या टी२० सामन्यापासून होणार आहे. हा सामना १५ सप्टेंबर रोजी धरमशाला येथे होणार आहे.
याबरोबर ऑल इंडिया रेडिओ भारतातील रणजी ट्राॅफीच्या ५, दुलीप ट्राॅफीच्या ५, देवधर ट्राॅफीच्या ४, इराणी कपच्या ५, सईद मुश्ताक अली स्पर्धेच्या ६ आणि विमेन चॅलेंजर स्पर्धेच्या ४ अशा स्पर्धांचे थेट रेडिओ प्रक्षेपण करणार आहे.
हा करार १० सप्टेंबर २०१९ ते ३१ ऑगस्ट २०२१ या काळासाठी असणार आहे.