भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकाचा कालावधी येत्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर समाप्त होणार आहे. रवी शास्त्रींनंतर हे पद सांभाळण्यासाठी बऱ्याचशा दिग्गज क्रिकेटपटूंची नावे समोर आली होती. परंतु बीसीसीआयने ही जबाबदारी माजी भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविड यांना दिली आहे. दरम्यान राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षक पदासह आणखी काही जबाबदाऱ्या देखील देण्यात येणार आहेत.
टी -२० विश्वचषक स्पर्धेचा प्रारंभ १७ ऑक्टोबरपासून होणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी -२० मालिकेला खेळली जाणार आहे. या मालिकेपासून राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपद सांभाळणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षकपद देण्याची मागणी जोर धरू लागली होती.
तसेच राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघातील अनेक युवा खेळाडू घडले आहेत. त्यांनी भारतीय अ संघ आणि भारतीय १९ वर्षांखालील संघाला प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे त्यांना देखील प्रशिक्षण देण्याचा दांडगा अनुभव आहे.
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयचे अधिकारी राहुल द्रविडच्या विस्तृत ज्ञानाचा आणि माहितीच जास्तीत जास्त फायदा कसा करून घ्यावा याचा विचार करत आहेत. तसेच त्यांची भूमिका भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपर्यंत मर्यादित नसून त्यापेक्षा अधिक असणार आहे. रवी शास्त्री यांना मुख्य प्रशिक्षकपदासाठी साडे आठ कोटी रुपये इतके वेतन दिले जाते. पण असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, राहुल द्रविड यांना अधिकचे वेतन दिले जाणार आहे, जे त्यांच्या नॅशनल क्रिकेट ॲकेडेमीच्या आणि रवी शास्त्रींच्या वर्तमान वेतनापेक्षा अधिक असेल.
काय आहे राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षक बनवण्याचे कारण?
राहुल द्रविड यांना मुख्य प्रशिक्षक बनवण्याचे मुख्य कारण म्हणजे, बीसीसीआयला रवी शास्त्रींनंतर त्यांच्यापेक्षाही उच्च दर्जाचा प्रशिक्षक हवा आहे. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने भारतीय संघाने श्रीलंकेत जाऊन विजय मिळवला होता. तर त्यांनी भारतीय १९ वर्षांखालील संघाला १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
Photo: नाही चालली कोणतीही हुशारी, टी२० विश्वचषकाच्या नव्या जर्सीवर पाकिस्तानने लिहिले भारताचे नाव
पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी भारत ‘या’ दोन बलाढ्य संघांशी करणार दोन हात, पाहा संपूर्ण वेळापत्रक