गतवर्षी कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता आयपीएल २०२० स्पर्धा युएईमध्ये पार पडली होती. परंतु, यंदा ही स्पर्धा भारतातच आयोजित करण्यात येत आहे. येत्या ९ एप्रिल रोजी आयपीएल २०२० चा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. तसेच १० एप्रिल रोजी दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे. मुंबईत कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता मुंबईमध्ये सामने होणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. याबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशातच मुंबईतील सामने दुसऱ्या ठिकाणी खेळवण्यात येणार असल्याची चर्चा रंगली होती. या चर्चेला पूर्णविराम देत सौरव गांगुली यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
ते म्हणाले की,” आयपीएलच्या कुठल्याही कार्यक्रमात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही. सर्व काही ठरल्याप्रमाणे होणार आहे. लॉकडाऊन मुळे आम्हाला कुठलाही त्रास होणार नाहीये. कारण आम्ही मुंबईमध्ये सामने आयोजित करण्यापूर्वी राज्य सरकारकडून परवानगी घेतली आहे. ”
मुंबईमध्ये १० एप्रिल पासून ते २५ एप्रिल पर्यंत आयपीएलचे १० सामने खेळवण्यात येणार आहेत. तसेच सध्ये सर्व खेळाडू बायो बबलमध्ये आहेत. मुंबई व्यतिरिक्त चेन्नई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरु आणि अहमदाबादमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्यात येणार आहेत.
नुकताच महाराष्ट्र शासनाने राज्यात विकेंड लॉकडाऊन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच मुंबईसह पूर्ण महाराष्ट्रात कर्फ्यु लावण्यात आला आहे. त्यामुळे रात्री ८ नंतर कुणालाही घराबाहेर जाण्याची परवानगी नाही. परंतु याचा आयपीएलवर कुठलाही परिणाम होणार नाही. महाराष्ट्र सरकारने मुंबईत सराव करत असलेल्या आयपीएल फ्रँचायझींना रात्री ८ नंतर सराव करण्याचीही मुभा दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आनंदाची बातमी: देवदत्त पड्डीकल सुटला कोरोनाच्या तावडीतून, पहिल्या लढतीत मुंबईकरांचा उडवणार धुव्वा!
मोठी बातमी! आयपीएलपुर्वी आरसीबीच्या चितेंत भर, पड्डीकलनंतर ‘हा’ अष्टपैलू कोरोनाच्या विळख्यात
मोईन अलीला अतिरेकी म्हणणाऱ्या तस्लीमा नसरीनवर भडकला जोफ्रा आर्चर; म्हणाला, ‘तू बरी आहेस ना, मला..’