भारतात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा विळखा पडला आहे. कोरोनाच्या सावटाखाली ९ एप्रिल ते ३० मे या कालावधीत भारतात इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. परंतु मैदानावर खेळाडूंनी प्रवेश करायच्या आधीच कोरोनाची एन्ट्री झाली आहे. काही दिवसांपुर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा सलामीवीर देवदत्त पड्डीकल कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. परंतु आता त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
प्रसिद्ध क्रिकेट वेबसाइट क्रिकबझने ट्विटरद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘७ एप्रिल रोजी पड्डीकलची दुसरी कोरोनाची करण्यात आली. यावेळी त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह निघाला आहे. त्यानंतर बीसीसीआयच्या प्रोटोकॉलनुसार त्याला पुन्हा आरसीबीच्या ताफ्यात सहभागी करण्यात आले आहे,’ असे त्यांनी लिहिले आहे.
याचा अर्थ असा होतो की, ९ एप्रिल रोजी चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात होणाऱ्या हंगामातील पहिल्या सामन्यात पड्डीकल खेळताना दिसू शकतो.
https://twitter.com/cricbuzz/status/1379670604803022850?s=20
युवा फलंदाज देवदत्त पड्डीकल याने साल २०२० मध्ये आरसीबीकडून आयपीएल पदार्पण केले होते. आपल्या पदार्पणातील हंगामात दमदार फलंदाजी करत त्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. पूर्ण हंगामात १५ सामने खेळाताना त्याने ४७३ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ७४ या सर्वोच्च वैयक्तिक खेळाचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या-
मोईन अलीला अतिरेकी म्हणणाऱ्या तस्लीमा नसरीनवर भडकला जोफ्रा आर्चर; म्हणाला, ‘तू बरी आहेस ना, मला..’
मोठी बातमी! आयपीएलपुर्वी आरसीबीच्या चितेंत भर, पड्डीकलनंतर ‘हा’ अष्टपैलू कोरोनाच्या विळख्यात






