सौरव गांगुली याने भारतीय क्रिकेट नियामक (बीसीसीआय) मंडळाच्या अध्यक्ष पदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले आहे. दुसरीकडे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी गांगुलीने सध्यातरी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, असे माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
“काहीतरी नवीन सुरू करण्याचा विचार चालू आहे जेणेकरून सगळ्यांना त्याचा फायदा होईल,” असे गांगुली यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
“माझ्या १९९२मध्ये सुरू झालेल्या क्रिकेटच्या प्रवासाला २०२२मध्ये ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. यामध्ये क्रिकेटने मला खूप काही दिले, शिकवले आहे. यामध्ये तुम्हा सर्वांचा मला आधार मिळाला. यासाठी मी तुम्हा सर्वांचाच आभारी आहे,” असे गांगुली यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
— Sourav Ganguly (@SGanguly99) June 1, 2022
गांगुलीच्या याच ट्वीटने तो अध्यक्षपद सोडणार की काय यावर प्रश्न निर्माण केले जात आहेत. गांगुलीने ऑक्टोबर २०१९मध्ये बीसीसीआयचे अध्यक्षपद स्विकारले होते. त्यानंतर त्याचा तीन वर्षाचा कारभाराचा कालावधी यावर्षी सप्टेंबरमध्ये संपत आहे.
गांगुली याच्या कार्यकाळात भारतीय संघात अनेक बदल पाहायला मिळाले आहे. २०१७पासून संघाचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीने २०२१चा टी२० विश्वचषक झाल्यावर संघाच्या कर्णधारपदाचा त्याग केला. त्याच्या एक महिन्यानंतरच त्याने वन-डे संघाचे तर जानेवारी २०२२मध्ये कसोटी कर्णधारपदावरूनही तो पायउतार झाला. त्याच्यानंतर रोहित शर्माला क्रिकेटच्या तिन्ही प्रकाराचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे.
सौरव गांगुली राजकारणात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नसली, तरी यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सौरव गांगुलीच्या घरी गेले होते. अशा स्थितीत गांगुली राजकारणात हात आजमावणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
महास्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! सौरव गांगुलीने सोडले बीसीसीआयचे अध्यक्षपद? ट्विटरवरून दिले संकेत