भारतीय संघाला पुढील महिन्यात इंग्लंडचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांची टी२० मालिका आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय सौरव गांगुली यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी म्हटले आहे की, भारतीय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि संघ व्यवस्थापन यांच्याद्वारे इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेत त्याच खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे, ज्यांना ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक खेळायचा आहे. संघातील प्रमुख खेळाडूंमधील रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या खेळाडूंच्या दुखापतीमुळे भारतीय टी२० संघात अनेक प्रयोग झाले आहेत. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत रिषभ पंत नेतृत्व करत आहे. दुसरीकडे, या महिनयाच्या शेवटी आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी हार्दिक पंड्याला कर्णधार बनवले आहे. मात्र, टी२० विश्वचषकासाठी आता काहीच महिने शिल्लक राहिले आहेत. अशात गांगुलींनी म्हटले आहे की, विश्वचषकासाठी संभावित खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळतील.
गांगुलीला जेव्हा विचारण्यात आले की, आयसीसी स्पर्धांमध्ये खेळाडूंना बदलणे योग्य पर्याय आहे का? यावर उत्तर देत गांगुलीने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “राहुल द्रविड या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे. तो स्थिरावलेल्या खेळाडूंसोबत कोणत्यातरी मंचावर खेळण्याचा विचार करत आहे. कदाचित पुढच्या महिन्याच्या इंग्लंड दौऱ्यापासून. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकात खेळण्याची शक्यता असलेल्या खेळाडूंसोबत आम्ही खेळण्यास सुरुवात करू.”
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत असलेल्या युवा भारतीय संघानेही दमदार प्रदर्शन करत सर्वांना भारावून सोडले आहे. मालिकेत ०-२ने पिछाडीवर पडल्यानंतर भारताने सलग २ सामने जिंकत मालिकेत बरोबरी केली आहे.
भारताला इंग्लंड दौऱ्यावर फक्त एक पुनर्नियोजित कसोटी सामना खेळायचा आहे. त्याव्यतिरिक्त ३ टी२० आणि ३ वनडे सामने खेळायचे आहेत. या दौऱ्यात भारतीय संघाला ४ दिवसांचा एक वॉर्मअप सामना असेल आणि त्यानंतर दोन टी२० सराव सामनेही खेळायचे आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरे व्वा! केकेआरनंतर आता ‘या’ क्रिकेट संघाचा मालक बनला शाहरुख खान, पहिल्या सामन्यासाठी उत्सुक
‘अब खेलने का नहीं *** का टाईम है’, दिनेश कार्तिकची फलंदाजी पाहून वीरूही झाला फॅन
नाद नाद नादच! सर्वात मोठी धावसंख्या, सर्वाधिक षटकार, नेदरलँडविरुद्ध इंग्लंडने रचले अर्धा डझन विक्रम