काही दिवसांपूर्वीच आयपीएल २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाने चौथे जेतेपद आपल्या नावावर केले होते. तर आगामी आयपीएल २०२२ स्पर्धेत २ नवीन संघ सहभागी होणार आहेत. या दोन नवीन संघासाठी काही दिवसांपूर्वीच लिलाव सोहळा पार पडला, ज्यामध्ये अहमदाबाद आणि लखनऊ संघाने बाजी मारली. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआयचे) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बुधवारी (२७ ऑक्टोबर) एटीके मोहन बागानच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत एटीके मोहन बागान संघाचे मालकी हक्क असणाऱ्या आरपीएसजी ग्रूपने लखनऊ संघावर सर्वाधिक बोली लावत हा संघ खरेदी केला आहे. त्यानंतर सौरव गांगुली यांनी हे पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
माध्यमांमध्ये चर्चा रंगायला सुरुवात झाली होती की, आरपीएसजी ग्रुपने लखनऊ संघ खरेदी केल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष आणि कंपनीचे संचालक या नात्याने हितसंबंधांचा संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सौरव गांगुली यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. सौरव गांगुली यांना असे वाटते की, त्यांचे अध्यक्ष असताना ते या गटासोबत राहिले तर त्यांना न्याय काम करणे कठीण होऊ शकते.
आरपीएसजी ग्रुपने खरेदी केला लखनऊ संघ
आरपीएसजी ग्रुपने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदा कुठला संघ खरेदी केला आहे. यापूर्वी २०१६ आणि २०१७ मध्ये झालेल्या हंगामात त्यांनी रायजिंग पुणे सुपर जायंट्स संघ खरेदी केला होता. आता या ग्रुपने लखनऊ संघ खरेदी केला आहे, ज्याचे सामने अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर पार पडतील.
सीव्हीसी कॅपिटलने खरेदी केला अहमदाबाद संघ
सीव्हीसी कॅपिटल जगभरातील क्रीडा स्पर्धांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ओळखली जाते. यापूर्वी ते फॉर्म्युला १ चे मालक होते. तर अलीकडेच त्यांनी ला लिगा स्पर्धेत देखील गुंतवणूक केली होती. सीव्हीसी कॅपिटल संघाचे सामने हे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहेत. नुकताच या स्टेडियमचे नामकरण करून नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे. तसेच हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वाचला ना गडी! पत्नीचा वाढदिवस विसरणे हाफिजला पडले असते महागात; सानियाने केली ‘अशी’ मदत