---Advertisement---

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली कोरोना पॉझिटिव्ह, हॉस्पिटलमध्ये केले दाखल

On: मंगळवार, डिसेंबर 28, 2021 10:00 AM
Sourav Ganguly
---Advertisement---

भारतीय क्रिकेटविश्वातून मगंळवारी (२८ डिसेंबर) मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली  (Sourav Ganguly) यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच असेही समोर येत आहे की त्यांना कोलकातामधील वूडलँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार गांगुली यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली होती. त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह (Corona Positive) आला असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. देशात ओमिक्रॉन व्हेरियंटची वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान गांगुली कोरोना पॉझिटिव्ह येणे चिंतेचा विषय आहे. गांगुली यांनी कोरोना वॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले आहेत.

गांगुली यांना यावर्षी दुसऱ्यांदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी वर्षाच्या सुरुवातीला त्यांना हृदयाशी संबंधिक तक्रारीमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर ते पुन्हा नेहमीप्रमाणे कामावर रुजू झाला होता.

अधिक वाचा – ‘पत्नी आणि गर्लफ्रेंड खूपच ताण देतात’, वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या त्या प्रश्नावर गांगुलीचे लक्षवेधी उत्तर

चर्चेत आहे गांगुली
गेल्या काही दिवसात भारतीय क्रिकेटमध्ये घडलेल्या काही घटनांमुळे गांगुली चर्चेत आला होता. भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहलीने टी२० संघाचे नेतृत्त्व सोडल्यानंतर त्याच्याकडून वनडे कर्णधारपदही काढून घेण्यात आले होते. तसेच त्याच्याऐवजी रोहित शर्माला भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते आणि विराटला केवळ कसोटी कर्णधारपदी कायम ठेवण्यात आले होते.

या प्रकरणाबाबत बोलताना गांगुली यांनी म्हटले होते की, त्यांनी विराटला टी२० कर्णधारपद सोडू नको असे सांगितले होते. मात्र, तो त्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याने निवड समीतीने मर्यादीत षटकांसाठी एकच कर्णधार असावा म्हणून विराटकडून वनडे कर्णधारपद काढून घेतले होते. मात्र, विराटने पत्रकार परिषदेत याच्याविरोधी भाष्य केले होते.

विराटने सांगितले होते की, वनडे कर्णधारपदावरून काढून टाकण्याच्या दीडतास आधी त्याला याबद्दल सांगण्यात आले होते. तसेच टी२० कर्णधारपद सोडू नको, असे त्याला कोणीही सांगितले नव्हते व त्याच्याशी कोणतीही चर्चा झाली नव्हती.

विराट आणि गांगुलीच्या परस्पर विरोधी भाष्यांमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. याबद्दल जेव्हा गांगुलीला पुन्हा विचारणा करण्यात आली तेव्हा, त्याने या प्रकरणाबाबत काहीही बोलण्यास नकार दिला होता आणि हे प्रकरण बोर्ड योग्य पद्धतीने हाताळेल, असे सांगितले होते.

व्हिडिओ पाहा – युवी अन् भज्जीमुळं भर टीम मीटिंगमध्येच रडला दादा 

सौरव गांगुलीची कारकिर्द 
बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष (BCCI president) गांगुलीने भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. त्याने १९९२ ते २००८ या कालावधीत भारताकडून क्रिकेट खेळले आहे. दरम्यान त्याने ३११ वनडे सामने खेळले असून ११३६३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २२ शतकांचा समावेश आहे. तसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ११३ सामने खेळले असून ७२१२ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने एक द्विशतक आणि १६ शतके लगावली आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याची २०१९ साली बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून निवड झाली.

महत्त्वाच्या बातम्या – 

तिसऱ्याच दिवशी बॉक्सिंग डे कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिका घातली खिशात; इंग्लंडचा डावाने पराभव

विश्वचषक आणि ऍशेस जिंकवूनही क्रिकेट ऑस्ट्रेलिया हटविणार कोच लँगरला? वाचा सविस्तर

इंग्लंडच्या ३९ वर्षीय खेळाडूची कमाल ! सूपरमॅन स्टाईलमध्ये केला झेलाचा ‘अविश्वसनीय’ प्रयत्न

युवी अन् भज्जीमुळं भर टीम मीटिंगमध्येच रडला दादा |When Yuvraj’s Prank Made Ganguly Cry

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---