कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारतात देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचे आयोजन होऊ शकले नाही. मध्यंतरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा सुरु करण्याचे संकेत दिले होते. आता बीसीसीआयने जैवसुरक्षित वातावरणात या स्पर्धांचे आयोजन करण्याचे ठरवले आहे आणि संभाव्य वेळापत्रकही तयार केले आहे.
देशांतर्गत क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्याबाबत बीसीसीआयने राज्यातील संघांना सल्ला मागितला आहे.
संघांना लिहिलेल्या पत्रात बीसीसीआयने देशांतर्गत सामने आयोजित करण्यासाठी चार पर्याय दिले आहेत, त्यातील पहिला पर्याय रणजी करकंड आणि दुसरा पर्याय म्हणजे फक्त सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धा आयोजित करणे.
तिसरा पर्याय रणजी करंडक आणि सय्यद मुश्ताक अली करंडक आयोजित करण्याबाबत आहे तर चौथा पर्याय दोन मर्यादित षटकांच्या (सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफी) स्पर्धांचा आराखडा तयार करण्याबाबत आहे.
पत्रात बीसीसीआयने स्पर्धेच्या संभाव्य तारखांचाही उल्लेख केला आहे.
रणजी करंडकसाठी (11 जानेवारी ते 18 मार्च) 67 दिवस प्रस्तावित आहे. मुश्ताक अली करंडक स्पर्धेसाठी 22 दिवसांचा (20 डिसेंबर ते 10 जानेवारी) कालावधी असेल. विजय हजारे ट्रॉफीचे आयोजन 11 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या कालावधीत 28 दिवसांत केले जाऊ शकते.
बीसीसीआय 38 संघांच्या स्थानिक स्पर्धेसाठी सहा ठिकाणी जैविक सुरक्षित निर्माण करेल. पत्रात म्हटले आहे की, “38 संघ पाच एलिट गट आणि एक प्लेट गटात विभागले जातील. एलिट गटात सहा संघ असतील तर प्लेट गटात आठ संघ असतील.”
कोरोनामुळे मिळालेल्या दीर्घकाळ विश्रांतीनंतर बंगाल टी20 चॅलेंज ही भारतातील पहिली क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाचे ‘हे’ दोन महत्त्वाचे शिलेदार तिसऱ्या वनडेतून आणि टी20 मालिकेतून बाहेर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर राहुलकडून भारतीय गोलंदाजांची पाठराखण, फलंदाजांना दिला सल्ला