भारतीय क्रिकेट मंडळ लवकरच आयसीसीला पात्र लिहून एमपीए अर्थात मेंबर पार्टीसिपेशन अग्रीमेंट (सदस्य सहभाग करार) रद्द करण्याच्या बेतात आहे. सध्या सुरु असलेला करार हा २०१४ साली झाला असून याचा कालावधी हा २०१४-२०२३ आहे. सध्या बीसीसीआय उत्पन्नाच्या झालेल्या मतदानावरून आयसीसीला चांगलाच धडा शिकवायच्या बेतात दिसत आहे.
नवीन उत्पन्न कराराप्रमाणे भारताला $२९३ मिलियन मिळणार आहे ज्याचा बीसीसीआयने जोरदार विरोध केला होता. आधीच्या कराराप्रमाणे बिग३ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांना मिळून तब्बल $५७० मिलियन मिळत होते.
भारत चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर झाला तर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. भारताला २०२३ पर्यंत आयसीसीतून बाहेर केले जाऊ शकते.
जर भारताने २०१४ साली झालेला एमपीए अर्थात मेंबर पार्टीसिपेशन अग्रीमेंट (सदस्य सहभाग करार) रद्द केला तर या सर्व स्पर्धांवर भारताला मुकावे लागेल.