---Advertisement---

अर्जुन पुरस्कारासाठी बीसीसीआयकडून या २ क्रिकेटपटूंच्या नावाची शिफारस

On: मंगळवार, मे 12, 2020 7:06 PM
---Advertisement---

बीसीसीआयकडून अर्जुन पुरस्कारांसाठी शिखा पांडे आणि दिप्ती शर्मा या दोन महिला खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. क्रिकेट क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल, BCCI ने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला या नावांची शिफारस केल्याचं सुत्रांकडून कळत आहे.

दिप्ती व शिखाने याच वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी२० विश्वचषकात जबरदस्त कामगिरी केली होती. त्याचेच फळ त्यांना मिळाल्याचे बोलले जात आहे. सध्यातरी या दोनच नावांबद्दल माध्यमांमध्ये वृत्त आहे.

विशेष म्हणजे आज शिखा पांडेचा ३१वा वाढदिवस आहे.

आतापर्यंत ५५ क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. १९६१ साली सलीम दुराणी यांना पहिल्यांदा अर्जुन पुरस्कार देण्यात आला. तर गेल्या वर्षी रविंद्र जडेजा व पुनम यादव या खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

१९८९मध्ये जन्म झालेल्या शिखा पांडने भारताकडून 2 कसोटी, ५२ वनडे व ५० टी२० सामने खेळले आहेत. यात तिने कसोटीत ४, वनडेत ७३ तर टी२०मध्ये ३६ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच फलंदाजीतही बऱ्यापैकी कामगिरी केली आहे.

१९९७मध्ये जन्म झालेल्या दिप्ती शर्माने भारताकडून ५४ वनडे व ४८ टी२० सामने खेळले आहेत. वनडेत तीने १४१७ धावा व ६४ विकेट्स तर कसोटीत ४२३ धावा व ५३ विकेट्स घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---