इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेचा मेगा ऑक्शन (Ipl 2022 mega auctions) सोहळा येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. हा सोहळा बेंगलोरमध्ये पार पडणार आहे. बीसीसीआयने (Bcci) ५९० खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये २२० परदेशी आणि ३७० भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. कोरोना प्रादुर्भाव असल्यामुळे मेगा ऑक्शनसाठी देखील नियमावली तयार करण्यात आली आहे. काय आहेत नियम? चला जाणून घेऊया.
इतके दिवस राहणार विलगिकरणात
बेंगलोरमध्ये (Benglore) पार पडणाऱ्या या मेगा ऑक्शनमध्ये सहभागी होणाऱ्या परदेशातील प्रशिक्षकांना आणि सदस्यांना सात दिवसांसाठी विलगिकरणात राहावे लागणार आहे. तसेच या मेगा ऑक्शनमध्ये सहभाग घेण्यासाठी त्यांना ११ फेब्रुवारी रोजी बेंगलोरच्या हॉटेलमध्ये पोहचावे लागणार आहे.
इतके सदस्य राहणार उपस्थित
बीसीसीआयने सर्व फ्रँचायजींना ४ फेब्रुवारीपर्यंत त्या सदस्यांची यादी देण्याचे आदेश दिले आहेत, जे या मेगा ऑक्शनमध्ये उपस्थित राहणार आहे. तसेच बीसीसीआयने सर्व फ्रँचायजींतील केवळ १० सदस्यांना उपस्थित राहण्याची अनुमती दिली आहे. ऑक्शन रूममध्ये १० टेबल असतील त्यावर केवळ ८० सदस्य असतील.
कोरोना चाचणी करणे अनिवार्य
तसेच आयपीएल २०२२ स्पर्धेच्या मेगा ऑक्शनमध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांना आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य असणार आहे. तसेच आत प्रवेश करण्यापूर्वी मेडिकल टीमला लस घेतल्याची माहिती द्यावी लागणार आहे.
लिलावासाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीत ५९० खेळाडूंपैकी ३७० भारतीय आणि २२० परदेशी खेळाडू आहेत. या लिलावात भारतानंतर ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक ४७ खेळाडू आहेत. ५९० खेळाडूंपैकी २२८ खेळाडू असे आहेत ज्यांनी यापूर्वी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तसेच ३३५ खेळाडू असे आहेत ज्यांनी अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाहीये. यासह सात खेळाडू नेपाळ, आयर्लंड आणि स्कॉटलंड इत्यादी देशांचे आहेत.
महत्वाच्या बातम्या :
अर्रर्रर्र… अतिउत्साह नडला! हातातली मॅच एका चुकीने गमावली, पाहा शेवटच्या चेंडूवर नेमकं काय घडलं
सचिनला गोलंदाजी करताना घाबरायचा ऑस्ट्रेलियन ‘स्पीडस्टार’; स्वतः केला खुलासा
कॅप्टन जोमात! उपांत्य सामन्यापूर्वी यश धूलने दाबली ऑस्ट्रेलियाची दुखरी नस; म्हणाला…