विराट कोहली आणि भारतीय संघाचे तत्कालिन प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या वादानंतर जुलै 2017 मध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी रवी शास्त्री यांची निवड झाली होती.
भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि भारतीय अ संघ व अंडर-19 संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या वेतनाचा काल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी खुलासा केला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संकेतस्थळावरून रवी शास्त्री आणि राहुल द्रविड यांचे 2018 चे वेतन किती आहे याची माहिती दिली आहे.
तसेच भारताचा युवा गोलंदाज बरींदर सिंग सरन याचेही भारतीय संघाच्या 2016 मधील ऑस्ट्रेलिया आणि झिब्बावे दौऱ्याचे थकलेले वेतन दिल्याचे जाहीर केले. सरनला या दोन दौऱ्यांचे मिळून 40 लाख रू. वेतन देन्यात आले आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना 18.04.18 ते 17.07.18 या कालावधीचे 63 लाख रुपये प्रती महिन्याप्रमाने 1 कोटी 89 लाख 37 हजार 500 रूपये इतके वेतन देण्यात आले आहे.
याचबरोवर रवी शास्त्री क्रिकेट जगातातील सर्वात महागडे प्रशिक्षक बनले आहेत.
भारतीय अ संघ व अंडर-19 संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना मार्च महिन्यासाठी 40 लाख 50 हजार रूपये इतके वेतन देण्यात आले आहे.
तसेच राहुल द्रविड यांचा प्रशिक्षक पदाचा करार 2019 पर्यंत वाढवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
–पराभवामुळे लगेच अफगानिस्तान संघाला दोष देऊ शकत नाही- अजिंक्य रहाणे
–मोठा खेळाडू यो यो टेस्ट फेल, थेट टीम इंडिया बाहेरचा रस्ता!