भारताला नुकताच न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत लाजिरवाणा पराभव पत्कारावा लागला. या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. शुक्रवारी (8 नोव्हेंबर) बीसीसीआयनं एक रिव्ह्यू बैठक घेतली. या बैठकीत कर्णधार रोहित शर्मा, निवड समितेचे अध्यक्ष अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि अध्यक्ष रॉजर बिन्नी उपस्थित होते. आता प्रश्न आहे या बैठकीत नेमकं घडलं काय?
‘पीटीआय’च्या एका रिपोर्टनुसार, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात अनेक मुद्यांवर एकमत नाही. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, गौतम गंभीरच्या कोचिंग स्टाईलवर प्रश्न उपस्थित झाले किंवा नाही, मात्र भारतीय थिंक टँकचं गंभीरसोबत अनेक मुद्द्यांवर एकमत नाही. बोललं जात आहे की, भारतीय संघात अष्टपैलू नितीश राणा आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांच्या निवडीमध्ये गौतम गंभीरचं मोठं योगदान होतं. मात्र टीम मॅनेजमेंट या निवडीमुळे नाखूष होती. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी या दोन खेळाडूंची निवड झाली आहे.
शुक्रवारी झालेल्या बैठकीत भारताच्या पराभवावर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. बीसीसीआयच्या एका सूत्रानं नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितलं की, ही बैठक तब्बल सहा तास चालली. अशा प्रकारच्या पराभवानंतर हे अपेक्षित होतं. भारत या महिन्याच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तेथे बीसीसीआयला हे निश्चित करावं लागेल की, संघ पुन्हा विजयी मार्गावर परतेल. याशिवाय थिंक टँक (गंभीर-रोहित-आगरकर) या बाबत काय विचार करते, हे देखील बोर्डाला जाणून घ्यायचं आहे. गौतम गंभीर या बैठकीला ऑनलाईन व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित राहिले होते.
हेही वाचा –
IND vs SA; शतक झळकावल्यानंतर संजू सॅमसनच्या नावावर झाले 5 मोठे रेकाॅर्ड
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी भारत-पाकिस्तान आमने-सामने! ‘या’ दिवशी होणार लढत
IND vs SA; शानदार विजयानंतर भारतीय कर्णधार म्हणाला, “आम्हाला कोणत्याही…”