भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी (२ नोव्हेंबर) एमपीएल स्पोर्ट्सची भारतीय संघाचा नवा किट प्रायोजक म्हणून निवड केली आहे. त्यांच्यात १२० कोटी रुपयांसह तीन वर्षांचा करार करण्यात आला आहे. बोर्डाच्या एका सदस्याने एएनआयशी बोलताना याविषयी माहिती दिली.
बोर्डाच्या त्या सदस्याने सांगितले की, “आम्ही नोव्हेंबर २०२० पासून ते डिसेंबर २०२३ पर्यंत एमपीएलसोबत कीट प्रायोजकत्त्वाचा करार केला आहे. एमपीएल या तीन वर्षांच्या करारात १२० कोटी रुपये देणार आहे. त्यामुळे त्यांना प्रति सामना ६५ लाख रुपये फी भरावी लागणार आहे. त्यानुसार वर्षभराचा विक्री दर ३ कोटी रुपये इतका असेल. तसेच यात प्रत्येक हंगामातील नेट सेल्सच्या १० टक्के रॉयल्टीचा समावेश आहे.”
नाईकी होता पुर्वीचा किट स्पॉन्सर
सप्टेंबर महिन्यात भारतीय संघाची जुनी किट प्रायोजक नाईकी आणि बीसीसीआय यांचा करार संपला आहे. त्यांच्यादरम्यान ३० कोटींच्या रॉयल्टीसह ३७० कोटी रुपयांमध्ये ४ वर्षांचा करार करण्यात आला होता. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे अनेक सामने रद्द करण्यात आले होते. परिणामत: नाइकीला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे बीसीसीआयने त्यांचा करार वाढवून द्यावा अशी त्यांनी मागणी केली होती. मात्र, बीसीसीआयने त्यांचा करार वाढवण्यास नकार दिला आणि नवे टेंडर काढले होते.
आयपीएलनंतर भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
युएईत चालू असलेला आयपीएल २०२०चा अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल. तिथे दोन्ही संघांमध्ये कसोटी, वनडे आणि टी२० मालिका होईल. २७ नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील पहिल्या वनडे सामन्यासह या दौऱ्याची सुरुवात होईल. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणादेखील केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL – धोनी पुढील हंगाम खेळणार, परंतु ‘हे’ खेळाडू होऊ शकतात चेन्नई संघातून बाहेर
IPL 2020: प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी कोहलीच्या RCB संघापुढे असेल ‘विराट’ आव्हान
ट्रेंडिंग लेख-
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?
सुरुवात हुकली पण शेवट आमचाच! आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये शानदार कामगिरी करणारे ३ संघ