भारतीय क्रिकेट संघाच्या घरच्या सामन्यांचे प्रसारण हक्क मिळविण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ई-लिलाव प्रक्रिया आयोजित केली होती. यामध्ये, यावेळी वायकॉम18 ने भारतीय संघाच्या आंतरराष्ट्रीय घरच्या सामन्यांचे टीव्ही आणि डिजिटल प्रसारण हक्क विकत घेतले आहेत. यासह, आता हा करार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी देशांतर्गत वनडे मालिकेपासून सुरू होईल. डिज्नी प्लस हॉटस्टारही भारतीय संघाच्या सामन्यांचे मीडिया हक्क मिळवण्याच्या शर्यतीत होती, पण त्यांना त्यात यश मिळू शकले नाही.
भारतीय संघाच्या घरच्या सामन्यांचे प्रसारण करण्याचे अधिकार यापूर्वी स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे होते, जे गेल्या 11 वर्षांपासून हे अधिकार सतत धारण करत होते. आता वायकॉम 18 ने त्यांचा पराभव केला आणि डिजिटल तसेच टीव्हीचे हक्क मिळवले. वायकॉम 18 ने पुढच्या पाच वर्षासाठी डिजिटल तसेच टीव्ही प्रसारणासाठी 5,966.4 कोटी रुपये किंमत मोजली आहे. वायकॉम याबाबत क्रिकबझच्या वृत्तानुसार, वायकॉमने एका सामन्यासाठी 67.8 कोटी रुपयांची बोली लावली आहे, जी गेल्या वेळेपेक्षा 7.8 कोटी रुपये जास्त आहे.
सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या वनडे मालिकेपासून सुरू होणाऱ्या या करारात वायकॉम18 ला पुढील 5 वर्षांत भारतीय संघाचे 88 आंतरराष्ट्रीय सामने दाखवण्याची संधी मिळणार आहे. हा करार मार्च 2028 मध्ये संपेल. आता भारतीय संघाच्या घरच्या सामन्याचे डिजीटल लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर केले जाईल. तर टिव्ही प्रसारण स्पोर्ट18 वर केले जाणार आहे.
पुढील 5 वर्षांसाठी बीसीसीआय कडून मीडिया अधिकार संपादन केल्यामुळे, वायकॉम18 ला आता अनेक क्रीडा स्पर्धांचे प्रसारण करण्याचे अधिकार मिळाले आहेत. यात आयपीएलचे डिजिटल प्रसारण अधिकार, टीव्ही आणि महिला प्रीमियर लीगचे डिजिटल अधिकार, 2024 पासून भारतात दक्षिण आफ्रिकेच्या घरच्या सामन्यांचे प्रसारण हक्क, रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज, दक्षिण आफ्रिका टी20, असे अनेक प्रकारच्या खेळांचे अधिकार आता वायकॉमकडे असणार आहेत. (bcci sale media rights viacom18 won tv and digital rights for next 5 years)
महत्वाच्या बातम्या-
राहुलच्या दुखापतीविषयी स्पष्टच बोलला मोहम्मद कैफ; म्हणाला, ‘ही भारतीय संघासाठी चांगली…’
‘वर्ल्डकप 2023ला सचिनने मारलेला षटकार पाहून मी…’, विराटचा खुलासा