ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतामध्ये वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठीचे अधिकृत वेळापत्रक लवकरच जाहीर होईल. या विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ भारतात येणार असल्याचे त्यांनी कबूल केले होते. स्पर्धेचे अंदाजे वेळापत्रक तयार असल्याचे सांगण्यात आले आहे. यातील पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान या सामन्याच्या आयोजन स्थळाबाबत पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली होती. या सामन्याचे ठिकाण बदलण्याची केलेली पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (पीसीबी) मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) धुडकावल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाने सुरक्षेच्या कारणास्तव आपले सामने कोलकाता, चेन्नई, हैदराबाद व कोलकाता या शहरांमध्ये आयोजित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार वेळापत्रक तयार असल्याचे सांगितले जातेय. या वेळापत्रकानुसार, पाकिस्तान व अफगाणिस्तान हा सामना नियोजित कार्यक्रमानुसार चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर खेळण्याचे निश्चित केले होते. मात्र, पीसीबीने आता हा सामना बंगलोर येथील स्टेडियमवर चिन्नास्वामी स्टेडियमवर घेण्याची मागणी केली आहे. अफगाणिस्तान संघात दर्जेदार फिरकीपटू असल्याने चेन्नई येथील खेळपट्टीवर त्यांना मदत मिळू शकते. याच गोष्टीची पाकिस्तान संघाला भीती वाटत असल्याचे सांगण्यात येते.
बीसीसीआयला याविषयी विचारणा करण्यात आल्यानंतर बीसीसीआयने थेट हे ठिकाण बदलण्यास नकार दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआयने काहीतरी ठोस कारण असल्याशिवाय आयोजन स्थळ बदलता येणार नाही असे म्हटले आहे. पाकिस्तान इतर सामने चेन्नईत खेळण्यास तयार असताना, या सामन्यासाठी प्रतिकूल का आहे असे बीसीसीआयकडून विचारण्यात आले.
चेन्नई येथील खेळपट्टी पारंपारिकरित्या फिरकी गोलंदाजांना मदत करणारी आहे. अफगाणिस्तान संघात मोहम्मद नबी, राशीद खान, मुजीब रहमान व नूर अहमद असे दर्जेदार फिरकीपटू आहेत. विशेष म्हणजे हे सर्व खेळाडू भारतात आयपीएल खेळत असल्याने, येथील परिस्थितीची त्यांना चांगली जाण आहे. दुसरीकडे, पाकिस्तानच्या संघातील एकाही खेळाडूला भारतात खेळण्याचा अनुभव नाही.
(BCCi Say No To Change Pakistan V Afghanistan Match Venue In 2023 ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
बापरे! बाल्कनीत बसून सामना पाहत होती महिला, फलंदाजाने षटकार मारल्यानंतर पुढे काय घडलं पाहाच
जागतिक योगा दिवस 2023 । केव्हा आणि कशी झाली योगा दिनाची सुरुवात? जाणून घ्या इतिहास