कोरोना व्हायरसने सध्या संपूर्ण भारतात थैमान घातले आहे. सामन्य माणसांपासून सेलिब्रेटींपर्यंत सर्वजण सध्या कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी संघर्ष करत आहेत. क्रिकेट क्षेत्रातीलही अनेक दिग्गजांनी कोरोना व्हायरसमुळे जीव गमावला आहे. यात आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. भारतीय क्रिकेटमधील नावाजलेले स्कोरर केके तिवारी यांनी शनिवारी (८ मे) वयाच्या ५२ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला.
गेले तीन दशके ते क्रिकेट सामन्यांमध्ये स्कोररचे काम करत होते. कानपूरमध्ये क्रिकेट खेळल्यानंतर त्यांनी १९९२ मध्ये दिल्लीचा रस्ता नोकरी करण्याच्या हेतूने धरला. पण त्यांनी नंतर नोकरी सोडून फिरोज शाह कोटला मैदानातच काम करणे सुरु केले. तसेच ते पंचगिरीही करु लागले.
त्यांना आयपीएल २०२१ हंगामादरम्यानही काम करण्याची इच्छा होती. मात्र, त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना आधी हेडगेवर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. पण नंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हता.
अखेर दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहन जेटली यांच्या मदतीमुळे त्यांना जलंधर येथील एम्स (AIIMS) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची कोरोनाविरुद्धची लढाई अपयशी ठरली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाबद्दल भारतीय क्रिकेट जगतातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंगने त्यांच्या निधनाबद्दल ट्विट करताना त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याची अवाहनही केले आहे.
Delhi based scorer KK Tiwary lost his battle against Covid 19. I urge cricket fraternity to come and help his family @imVkohli @SDhawan25 @virendersehwag @GautamGambhir @cricketaakash @MithunManhas @BishanBedi @rohanjaitley 🙏🙏 https://t.co/uibk94s4fR
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) May 8, 2021
तिवारी यांच्या मागे कुटुंबात त्यांची पत्नी, २ मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची एक मुलगी वकिलीचे शिक्षण घेत आहे तर मुलगा ७ वीत आहे.
त्यांनी आत्तापर्यंत ४ कसोटी, ५ वनडे आणि ६० रणजी सामन्यांमध्ये स्कोररचे काम केले आहे. तसेच ते ५० आयपीएल सामन्यांमध्येही स्कोरर होते. याबरोबरच ते १९८५ पासून स्थानिक क्रिकेटमध्ये पंचगिरीही करायचे.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियात झाली अर्झन नागवासवालाची एंट्री, तब्बल ४६ वर्षांनंतर घडला ‘हा’ इतिहास