भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) 2023च्या एकदिवसीय विश्वचषकात (One Day World Cup) भारताकडून खेळताना दिसला होता. शमी नुकताच बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये सराव करताना दिसला, परंतु त्याच्या पुनरागमनावर अजूनही प्रश्नचिन्ह आहेत. तत्पूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी या विषयावर मोठं वक्तव्य केलं आहे.
यापूर्वी असा दावा केला जात होता की, मोहम्मद शमी (Mohammed Shami) सप्टेंबरमध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेत पुनरागमन करू शकतो. पण आता शमी ना दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार ना बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत. दरम्यान, भारतीय संघाला ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 3 कसोटी सामने खेळायचे आहेत, जर शमी तंदुरुस्त झाला तर त्याआधी तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
एएनआयशी बातचीत दरम्यान, बीसीसीआय सचिव जय शाह (Jay Shah) यांना मोहम्मद शमीच्या (Mohammad Shami) फिटनेस आणि त्याच्या पुनरागमनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जय शाह (Jay Shah) म्हणाले, “मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार की नाही, हे केवळ त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे. एनसीएच्या अहवालाच्या आधारे या विषयावर निर्णय घेतला जाईल.”
शमीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोवायचं झालं, तर त्यानं भारतासाठी 64 कसोटी, 101 एकदिवसीय आणि 23 टी20 सामने खेळले आहेत. 64 कसोटी सामन्यात त्यानं भारतासाठी 27.71च्या सरासरीनं 229 विकेट्स घेतल्या आहेत, दरम्यान त्याचा इकाॅनाॅमी रेट 3.30 आहे. 101 एकदिवसीय सामन्यात शमीनं 23.68च्या सरासरीनं 195 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याचा इकाॅनाॅमी रेट 5.55 आहे. 23 टी20 सामन्यात त्यानं भारतासाठी 24 विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याचा इकाॅनाॅमी रेट 8.94 तर सरासरी 29.62 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ दिग्गज खेळाडूच्या जीवनावर येणार चित्रपट! म्हणाला, “माझ्या करोडो चाहत्यांना…”
‘बाबर-रिजवान’ नाही तर हा खेळाडू पाकिस्तानचा सुपरस्टार, वसीम अक्रमचा धक्कादायक खुलासा
‘सराव न करता बांग्लादेश मालिका…’, रोहित-विराटच्या विश्रांतीवर गावस्कर संतापले