इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा दुसरा टप्पा सध्या युएईमध्ये सुरु आहे. आयपीएलला गेल्या १४ वर्षात जगभरातून मोठी लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे चाहते टीव्हीवरही मोठ्या प्रमाणात आयपीएलचे सामने पाहात असतात. नुकतेच बीसीसीआयचे सचिव जय शाह सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये टीव्ही पाहणाऱ्यांच्या संख्येवर अर्थात ‘टीआरपी’वर खूप खुश झाले आहेत. स्पर्धेला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत.
शाह यांनी ट्वीट केले, ‘आयपीएल २०२१ ची दर्शकसंख्या सतत वाढत आहे ही माहिती शेअर करताना मला आनंद होत आहे. टीव्ही दर्शक संख्या ३५ व्या सामन्यापर्यंत ३८ कोटी आहे, जे २०२० मध्ये समान टप्प्यापर्यंत प्रेक्षकांच्या संख्येपेक्षा एक कोटी १२ लाखांहून अधिक आहे. त्यामुळे सर्वांचे आभार. इथून पुढील सामने अधिक रोमांचक होत जातील.’
I am delighted to share that #IPL2021 continues to register significant growth in viewership
????
380 million TV viewers (till match 35)
12 million more than 2020 at the same stage????????Thank you, everyone. It will only get more exciting from here on @IPL @StarSportsIndia @BCCI
— Jay Shah (@JayShah) September 30, 2021
विशेष म्हणजे, कोरोना महामारीमुळे, आयपीएलचा १४ वा हंगाम ‘मे’ मध्ये २९ सामन्यांनंतर पुढे ढकलण्यात आला होता. कारण भारतात आयपीएल खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या बायो-बबल मध्ये अनेक त्रुटी होत्या आणि त्यामुळे अनेक संघांच्या खेळाडूंमध्ये करोनाची प्रकरणे समोर आली होती. यूएईमध्ये या महिन्यात आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू झाला आणि चाहत्यांमध्ये आयपीएलची वाढती आवड पाहून, प्रेक्षकांची संख्या वाढली. आयपीएलचे भारतात थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्सवर केले जात आहे.
आयपीएलचा १४ वा हंगाम ४ मे रोजी अचानक पुढे ढकलण्यात आला होता, कारण अनेक संघांमध्ये कोरोनाची प्रकरणे समोर आली होती. २ मे पर्यंत एकूण २९ सामने खेळले गेले होते. आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्याच्या स्थगितीपर्यंत दिल्ली कॅपिटल्स आठ सामन्यांत सहा विजयांसह पहिल्या क्रमांकावर होती, तर चेन्नई सुपर किंग्स पाच विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. त्याचबरोबर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ पाच विजयानंतर तिसऱ्या स्थानावर होता.
आयपीएलच्या १४ व्या हंगामात आतापर्यंत ४४ सामने खेळले गेले आहेत. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, गुणतालिकेत चेन्नईचा संघ १८ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर दिल्लीचा संघ १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, बेंगलोर (१४) आणि कोलकाता (१०) संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
AUSW vs INDW: दुसऱ्या दिवशीही पावासाचा व्यत्यय, पण मंधनाच्या शतकामुळे भारतीय संघ भक्कम स्थितीत
टी२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करणारे ५ फलंदाज, भारताच्या ‘रनमशीन’चाही समावेश






