रोहित शर्मा आणि विराट कोहली हे सध्या जगातील उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहेत. त्यांचे जगभरात करोडो चाहते आहेत. परंतु तुम्हाला माहित आहे का की, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचा आवडता क्रिकेटपटू कोण आहे? जय शाह यांनी एका मुलाखती दरम्यान, त्यांचा आवडता क्रिकेटपटू कोण याचा खुलासा केला.
जेव्हा जय शाह यांना प्रश्न विचारला गेला की तुमचे 3 सर्वात आवडते खेळाडू कोण? यावर ते म्हणाले की, “सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि महेंद्र सिंह धोनी. जर आत्ताच्या वेळी बघितलं तर रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या माझ्या आवडत्या खेळाडूंच्या यादीत आहेत”, असं त्यांनी सांगितलं.
सुनील गावस्कर 100 कसोटी सामने खेळणारे जगातले पहिले क्रिकेटपटू आहेत. त्यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध पदार्पणाच्या कसोटी मालिकेत 744 धावा बनवल्या होत्या. महान खेळाडू गावस्करांच्या नावे वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटीमध्ये सर्वात जास्त 2749 धावा बनवण्याचा रेकाॅर्ड आहे. त्यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध सर्वात जास्त 13 शतकं ठोकली आहेत.
महेंद्र सिंह धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. तो कर्णधार असताना त्यानं भारताला 2 विश्वचषक जिंकून दिले. तसेच त्याच्या नेतृत्वात टीम इंडियानं एकूण 3 आयसीसी ट्राॅफी जिंकल्या आहेत. आयपीएलमध्ये महेंद्र सिंह धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळतो. त्याच्या नेतृत्वात चेन्नईनं आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त 5 वेळा ट्रॉफी जिंकून मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं 200 कसोटी सामने आणि 463 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये त्यानं 51 शतकं अन् 68 अर्धशतकं ठोकली आहेत. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानं 49 शतकं आणि 96 अर्धशतकं ठोकली आहेत. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं ठोकणारा जगातला एकमेव खेळाडू आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
नेपाळचा स्टार क्रिकेटपटू संदीप लामिछानेला कोर्टाकडून क्लीन चिट, बलात्काराचा होता आरोप
जोस बटलर तर गेला, आता सलामीवीर म्हणून कोण खेळणार? राजस्थान रॉयल्सकडे आहेत ‘हे’ 3 पर्याय
मुंबई इंडियन्सनं रिटेन नाही केलं तर रोहित शर्मा कोणत्या टीममध्ये जाणार? हिटमॅनकडे आहेत ‘हे’ पर्याय