---Advertisement---

जोस बटलर तर गेला, आता सलामीवीर म्हणून कोण खेळणार? राजस्थान रॉयल्सकडे आहेत ‘हे’ 3 पर्याय

---Advertisement---

आयपीएल 2024 च्या शेवटच्या दोन लीग सामन्यांपूर्वी राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला. संघाचा स्टार फलंदाज जोस बटलर पाकिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी इंग्लंडला परतला आहे. 22 मे पासून खेळल्या जाणाऱ्या या मालिकेसाठी इंग्लिश क्रिकेट बोर्डानं आयपीएलमध्ये सहभागी आपल्या खेळाडूंना परत बोलावलंय.

आयपीएलच्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी बटलरची कामगिरी जबरदस्त होती. त्यानं 11 सामन्यात 359 धावा केल्या, ज्यात दोन शतकी खेळींचाही समावेश आहे. मात्र तो स्पर्धा मध्येच सोडून गेल्यानं संघाला त्याची उणीव नक्कीच भासेल. आता राजस्थान रॉयल्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीवीर म्हणून जोस बटलरची जागा कोणते खेळाडू घेऊ शकतील, हे आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगणार आहोत.

3) टॉम कोहलर-कॅडमोर – इंग्लंडचा फलंदाज टॉम कोहलर-कॅडमोर राजस्थान रॉयल्ससाठी जोस बटलरच्या जागी खेळू शकतो. कोहलर-कॅडमोर हा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यानं 2013 मध्ये क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. 2016 मध्ये झालेल्या टी20 ब्लास्टमध्ये त्यानं 54 चेंडूत 127 धावांची खेळी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतले होतं. कोहलर-कॅडमोर यानं आतापर्यंत खेळलेल्या 190 टी20 सामन्यांमध्ये 4734 धावा केल्या आहेत.

2) डोनोवान फरेरा – जोस बटलरच्या अनुपस्थितीत राजस्थान रॉयल्सला आता अशा एका सलामीच्या फलंदाजाची गरज आहे, जो वेगानं धावा काढण्यास सक्षम असेल. यासाठी दक्षिण आफ्रिकेचा डोनोवान फरेरा हा उत्तम पर्याय आहे. त्याच्यामध्ये मैदानाच्या चारही कोपऱ्यांमध्ये शॉट्स मारण्याची क्षमता आहे. फरेरानं SA20 मध्ये आपल्या संघासाठी मॅच विनरची भूमिका बजावली होती.

1) ध्रुव जुरेल – जोस बटलरच्या जागी राजस्थानच्या संघात विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेलचाही समावेश केला जाऊ शकतो. त्यानं आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांमध्ये केवळ 131 धावा केल्या आहेत. मात्र त्याच्याच किती क्षमता आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. जुरेल वेगानं धावा गोळा करण्यात पटाईत आहे. सलामीवीर म्हणून तो राजस्थानला प्लेऑफचं तिकीट मिळवून देण्यात महत्त्वाचं योगदान देऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

“जर मी आरसीबीविरुद्ध खेळलो असतो तर…”, रिषभ पंतनं लगावला बीसीसीआयला टोला; म्हणाला…

राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वी पंजाब किंग्जला मोठा धक्का! हा स्टार खेळाडू दुखापतीमुळे मायदेशी परतला

आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्याला बसणार पावसाचा फटका! 18 मे रोजी बंगळुरूचं हवामान कसं असेल? जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---