---Advertisement---

आयपीएलच्या ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमाबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “हा नियम…”

---Advertisement---

आयपीएल 2024 दरम्यान काही दिग्गज क्रिकेटपटूंनी ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमाबाबत आवाज उठवला आहे. या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंचं नुकसान होत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा देखील या नियमाचा चाहता नाही.

आता आयपीएलमधील ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना जय शाह म्हणाले, “आयपीएलमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम कायमस्वरूपी नाही. त्याचं पुन्हा पुनरावलोकन केलं जाईल.” त्यांनी सांगितलं की, बोर्डाला अद्याप ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमाबाबत संघांकडून कोणताही फिडबॅक मिळालेला नाही. परंतु 2024 टी-20 विश्वचषक संपल्यानंतर या नियमाचं पुनरावलोकन केलं जाईल, असं ते म्हणाले.

मुंबईत माध्यमांना प्रतिक्रिया देताना जय शाह म्हणाले की, “हा नियम फायद्याचा ठरला आहे, कारण यामुळे दोन नवीन भारतीय खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली.” शाह म्हणाले, “इम्पॅक्ट प्लेयर नियम हा चाचणी म्हणून आणला गेला होता. या नियमाची जमेची बाजू म्हणजे दोन अतिरिक्त भारतीय खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते. आणखी दोन भारतीय खेळाडूंना संधी मिळणं चांगलं नाही का? या नियमामुळे स्पर्धाही वाढत आहे. मात्र जर खेळाडूंना हे योग्य वाटत असेल तर आम्ही त्यावर बोलू. आम्ही आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कप झाल्यानंतर याबाबत बैठक घेऊन निर्णय घेऊ.”

जय शाह पुढे म्हणाले की, “टी-20 विश्वचषकानंतर आम्ही खेळाडू, फ्रँचायझी संघ आणि प्रसारकांशी बोलू आणि पुढे काय करायचे ते ठरवू. हा कायमचा नियम नाही. याशिवाय टी-20 लीग चॅम्पियन्स लीगबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही,” असंही जय शाह यांनी सांगितलं.

आयपीएलच्या ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमाबाबत अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी भाष्य केलं आहे. भारताच्या रोहित शर्मा, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल यांसारख्या खेळाडूंनी या नियमाविरोधात आपलं मत मांडलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

आरसीबीसाठी अजूनही अवघड आहे प्लेऑफचा रस्ता, जाणून घ्या विराट कोहलीची टीम कशाप्रकारे होऊ शकते क्वालिफाय

BCCI लवकरच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू करेल, राहुल द्रविड यांचं भविष्य काय?

अभी हम जिंदा है ! आयपीएल 2024 स्पर्धेतील आरसीबीचे आव्हान अजूनही कायम, दारून पराभवानंतर पंजाब मात्र ‘OUT’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---