---Advertisement---

बीसीसीआयची मोठी घोषणा! ‘या’ दिवशी टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची नवी जर्सी होणार लॉन्च

On: शुक्रवार, ऑक्टोबर 8, 2021 5:17 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १५ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर यूएई आणि ओमानमध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपद मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. कारण या संघातील खेळाडू चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. दरम्यान विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या प्रारंभ होण्यापूर्वी बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.

टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला १७ ऑक्टोबर पासून प्रारंभ होणार आहे. भारतीय संघाची पहिलीच लढत २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी दोन्ही देशातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ही स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना बीसीसीआयने भारतीय संघाच्या नवीन जर्सीची घोषणा केली आहे.

बीसीसीआयने एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर भारतीय संघाची नवीन जर्सी लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे, असे लिहिले आहे. हा कार्यक्रम १३ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तसेच त्यांनी कॅप्शन म्हणून, “ज्या गोष्टीची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत आहेत, १३ ऑक्टोबरला याची घोषणा करण्यात येणार आहे,” असे लिहिले आहे.

यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाने आपली नवीन जर्सी लॉन्च केली होती. यापूर्वी भारतीय संघाची जर्सी आकाशी रंगाची होती. त्यानंतर ही जर्सी गडद निळ्या रंगाची करण्यात आली होती. यामध्ये १९९२ विश्वचषक स्पर्धेत वापरण्यात आलेल्या जर्सीची झलक होती.

भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक- 
सुपर १२ फेरी – 
२४ ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई ( संध्या- ७.३० वाजता)
३१ ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई ( संध्या- ७.३० वाजता)
३ नोव्हेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, अबुधाबी (संध्या- ७.३० वाजता)
५ नोव्हेंबर – भारत विरुद्ध ब गटातील अव्वल संघ, दुबई ( संध्या- ७.३० वाजता)
८ नोव्हेंबर – भारत विरुद्ध अ गटातील अव्वल संघ, दुबई ( संध्या- ७.३० वाजता)

बाद फेरी – 
१० नोव्हेंबर –  उपांत्य सामना – १, अबुधाबी (संध्या- ७.३० वाजता)
११ नोव्हेंबर – उपांत्य सामना – २, दुबई (संध्या- ७.३० वाजता)
१४ नोव्हेंबर – अंतिम सामना, दुबई (संध्या- ७.३० वाजता)

महत्त्वाच्या बातम्या –

भारताला विश्वचषकात हरवले, मिळेल कोरा चेक, पाकिस्तान संघाला मोठी ऑफर

‘ना राष्ट्रीय संघासाठी काही केलं, ना आयपीएल फ्रँचायझीसाठी’, RRच्या खेळाडूला गावसकरांचा चिमटा

युवा जेमीमाचा ऑस्ट्रेलियात डंका, टी२०त धडाकेबाज खेळी करत ‘या’ विश्वविक्रमाला घातली गवसणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---