---Advertisement---

संधी सोडायची नाय! सिडनी कसोटीसाठी नटराजन करतोय कसून सराव, पाहा व्हिडिओ 

On: रविवार, जानेवारी 3, 2021 5:40 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी येथे होणारा तिसरा कसोटी सामना अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सामन्याद्वारे युवा भारतीय वेगवान गोलंदाज टी नटराजन कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. भारताचा अनुभवी गोलंदाज उमेश यादवला मेलबर्न कसोटी सामन्यात गोलंदाजी करताना दुखापत झाली होती. सामन्यानंतर केलेल्या चाचण्यांमध्ये उमेशची दुखापत गंभीर असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याने उर्वरित सामन्यातून माघार घेतली. त्याच्याजागी नटराजनला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.

नुकताच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नटराजनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत नटराजन सराव सत्रात घाम गाळत असल्याचे दिसत आहे. बीसीसीआयने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “नटराजन या दौऱ्यावर त्याला मिळालेल्या संधींना सहजासहजी सोडणार नाही.”

तसेच त्याच्या दुसरा एक व्हिडिओ शेअर करत बीसीसीआयने म्हटले आहे की “टोपी पडली पण झेल सुटला नाही.”

बीसीसीआयने शेअर केला होता भारतीय संघाचा व्हिडिओ

यापुर्वी बीसीसीआयने भारतीय संघाचा सराव सत्रादरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओत भारतीय क्रिकेटपटू उत्साहाने सराव करताना दिसत होते. काही खेळाडू फलंदाजीचा सराव करत होते, तर काही गोलंदाजीचा. तसेच काही खेळाडू यष्टीरक्षणाचा सराव करत होते. दरम्यान मोठ्या जोशात ओरडू- ओरडू ते एकमेकांना सरावासाठी प्रोत्साहित करताना दिसत होते.

टी नटराजनबद्दल थोडेसे

टी नटराजन हा मुळचा तामिळनाडूचा गोलंदाज आहे. डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणाऱ्या नटराजनने यंदाच्या आयपीएलमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. नटराजनने याच ऑस्ट्रलिया दौऱ्यात भारताकडून वनडे आणि टी२० मध्ये पदार्पण केले. त्याने या दौऱ्यात एकूण १ वनडे आणि ३ टी२० सामने खेळले. यात त्याने ८ विकेट्स घेतल्या आहेत. भारताने टी-२० मालिकेत मिळवलेल्या विजयात त्याने सिंहाचा वाट उचलला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

नव्या वर्षाचा नवा जोश! सिडनी कसोटीपुर्वी टीम इंडियाचा कसून सराव, पाहा व्हिडिओ 

काय सांगता! सराव सत्रात ‘या’ प्रमुख भारतीय फलंदाजाच्या हाताला जोरदार चेंडू लागला अन्…

ब्रेकिंग! उर्वरित कसोटी सामन्यांकरिता भारताच्या कसोटी संघात उमेश यादवच्या जागी ‘टी नटराजन’ला संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---