भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय मागील काही कालावधीपासून सातत्याने अनेक महत्त्वचे निर्णय घेत आहे. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने पुरुष व महिला क्रिकेटपटूंना समान वेतन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला. त्यानंतर आता अशाच प्रकारचा आणखी एक निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेटमधील सर्वात मानाची स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये यावर्षीच्या हंगामापासून महिला पंच दिसून येतील.
बीसीसीआय लवकरच महिलांसाठी अंपायरिंग चाचणी घेणार आहे. संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्यानंतर महिला पंच देशांतर्गत क्रिकेटमध्ये अंपायरिंग करताना दिसतील. सध्या निवड झालेल्य तीन महिला पंच सध्या सामन्यांदरम्यान ऑफिशिएटिंग (स्कोअररचे काम आणि इतर) करतात. यंदाच्या रणजी ट्रॉफी हंगामातही त्या ही कामगिरी बजावताना दिसतील.
यावेळी रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी ज्या तीन महिलांची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये मुंबईच्या वृंदा राठी, चेन्नईच्या जननी नारायण आणि गायत्री वेणुगोपालन यांचा समावेश आहे. या तिघीही रणजी ट्रॉफीच्या या हंगामात काम करताना दिसतील. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, लवकरच रणजी ट्रॉफीमध्ये महिला पंचही दिसणार आहेत. पुढील हंगामासाठी आम्ही महिला पंचांची यादी तयार करणार आहोत. त्या सर्वांची एक चाचणी होईल. ती चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर महिला पंच देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतील.
भारतीय क्रिकेटमध्ये महिलांना समानतेचे स्थान देण्यासाठी काही महिन्यांपूर्वी महिला खेळाडूंची मॅच फी समान केली होती. असा निर्णय यापूर्वी कोणत्याही बोर्डाने घेतलेला नाही. तसेच, पुढील वर्षी प्रथमच महिला आयपीएलदेखील खेळवण्यात येईल.
(BCCI Thinking Womens Umpires In Ranji Trophy 2022-2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला ‘डबल ट्रबल’! लाजिरवाण्या पराभवानंतर खेळाडूंच्या खिशालाही लागली कात्री; आयसीसीने केली कारवाई
आपल्याच खेळाडूला कोट्यावधी कमावण्यापासून रोखत आहेत ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक, वाचा संपूर्ण प्रकरण