आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे संयुक्त अरब अमिरातीत यशस्वी आयोजन केल्यानंतर बीसीसीआयने आता पुढील हंगामाची तयारी सुरू केली आहे. आयपीएल २०२१च्या हंगामात बीसीसीआय एक नाही, तर दोन नवीन संघ खेळणार असल्याची माहिती समोर येत आहे. २४ डिसेंबरला होणार्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या प्रस्तावावर चर्चा केली जाईल.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या दोन संघांपैकी एक संघ अहमदाबाद शहराचा असेल, हे जवळजवळ निश्चित झाले आहे. दुसर्या संघांच्या स्थानासाठी लखनऊ, कानपूर आणि पुणे या शहरांमधे स्पर्धा आहे. अर्थात नवीन संघांचा समावेश करण्यासाठी असा प्रस्ताव बीसीसीआयच्या येत्या बैठकीत पारित होणे आवश्यक आहे. या बैठकीत दोन नवीन संघ सामील करण्याच्या प्रस्तावावर इतर प्रतिनिधींची मते लक्षात घेतली जातील.
संघमालकीसाठी स्पर्धा
नवीन आयपीएल संघांच्या मालकीसाठी गौतम अदानी यांचा अदानी समूह आणि संजीव गोयंका यांचा आरपीजी समूह, हे दोन प्रबळ दावेदार असतील. गोयंका समूहाच्या मालकीच्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने यापूर्वी आयपीएलच्या दोन हंगामात सहभाग घेतला होता. या दोन बड्या उद्योग समूहांव्यतिरिक्त दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल हे देखील आयपीएल संघ खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत. मोहनलाल यांनी आयपीएलच्या मागील हंगामात सामने पाहण्यासाठी युएई मध्येही हजेरी लावली होती.
मेगा ऑक्शन होण्याची शक्यता
आयपीएलच्या चौदाव्या हंगामात दोन नवीन फ्रॅंचायझींचा समावेश करायचा असल्यास बीसीसीआयला मेगा ऑक्शन घ्यावे लागेल. नवीन संघांचा समावेश करण्याची अधिकृत घोषणा झाली नसली, तरी बीसीसीआयने इतर संघाना मेगा ऑक्शनसाठी तयार राहण्याची सूचना यापूर्वीच दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील हंगामासाठी वेळ कमी असला, तरी आयपीएल गव्हर्निंग काऊंसिल याबाबत ३-४ आठवड्यांत निर्णय घेऊन अधिकृत घोषणा करेल, असेही बोर्डाशी संबंधित सूत्रांनी सांगितले आहे.
नव्याने सामील होणार्या संघांसाठी हे मेगा ऑक्शन आवश्यक असेल. मात्र, इतर संघामध्ये याबाबत मतमतांतरे असण्याची शक्यता आहे. एकीकडे मागील हंगामातील खराब कामगिरीमुळे चेन्नई सुपर किंग्ज सारख्या संघाना नवीन संघबांधणीसाठी हे ऑक्शन उपयुक्त असेल. मात्र, दुसरीकडे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्ससारख्या संतुलित संघांसाठी हे ऑक्शन नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेचे ‘संपूर्ण वेळापत्रक’; पाहा कधी आणि कुठे होणार सामने
भारत-ऑस्ट्रेलिया टी20 सामन्यात मैदान गच्च भरणार, सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
…म्हणून मिशेल स्टार्क भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेत खेळला नाही, फिंचने केला खुलासा
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारे ५ संघ; टीम इंडिया आहे ‘या’ स्थानावर
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर
‘हीच’ ती ३ तीन कारणे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसर्या वनडेत भारताकडून पत्करावा लागला पराभव