आयसीसी वनडे विश्वचषक 2023चे आयोजन भारतातील 10 वेगवेगळ्या स्टेडियमवर होणार आहे. बीसीसीआय या मोठ्या स्पर्धेचे जयमानपद भूषवण्यात कुठेच कमी पडू इच्छित नाही. 5 ऑक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या वनडे विश्वचषकाची तयारी बीसीसीआयने मागच्या काही महिन्यांपासूनच सुरू केली आहे. त्याच्या माहितीनुसार विश्वचषकाचे सामने खेळले जाणाऱ्या 10 स्टेडियमला बीसीसीआयकडून आर्थिक मदत मिळाली आहे, जेणेकरून स्टेडियममध्ये त्यांना आवश्यक त्या सुधारणा करता येतील.
माध्यमांतील वृत्तांनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर तुफान पैसा खर्च करण्याच्या तयारीत आहे. विश्वचषकाला अजून तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ बाकी असतानाच बीसीसीआय एका झटक्यात 500 कोटी खर्च करणार आहे. विश्वचषक सामना खेळल्या जाणाऱ्या प्रत्येक स्टेडियमवर 50 कोटी रुपये बीसीसीआयकडून मिळणार आहेत. स्टेडियमध्ये आवश्यक त्या सुधारणा करता याव्या, यासाठी बीसीसीआय हा खर्च करत आहे.
माहितीनुसार मुंबईच्या स्टेडियमवर नवीन प्लोड लाईट्स आणि कार्पोरेट बॉक्स बनवला जाणार आहे. कोलकातामध्ये ड्रेसिंग रुममध्ये सुधारणा केली जाणार आहे. धरमशाला स्टेडियमवर मागच्या काही महिन्यांपासून नवीन आउटफिल्ड बनवण्याचे काम सुरू आहे. तर पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर तात्पुरते छत. तर दिल्लीमध्ये तिकिट सिस्टिम, सिट्स आणि टॉईलेट्सचे काम करून घेतले जाणार आहे.
बीसीसीआयचे माजी खजिनदार आणि हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अरुण धूमल यांनी याविषयी माहिती दिली. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार धूमल म्हणाले, “आम्ही स्टेडियमच्या पूर्ण पृष्ठभाग पुन्हा तयार केला आहे. महत्वाच्या अधिकारी आणि पाहुण्यांसाठी कारपोरेट बॉक्समध्ये सुधारणा केल्या आहेत. यासाठी जाणकार आणि अनुभवी लोकांना कामावर घेतले. स्टेडियमधील पाणी बाहेर काढण्यासाठी आमच्याकडे चांगल्या सुविधा असाव्या असा प्रयत्न आङे. यासाठी विदेशातून खास घवत आणले गेले. स्टेडियमचे सिट्स बदलले, स्टॅन्ड्सला नवीन रंग दिला. काठी ठिकाणी लिकेजची समस्या होती, आम्ही तीदेखील ठीक केली.”
दरम्यान, वनडे विश्वचषकाची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी होणार असली, तरी भारताला आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी खेळायचा आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेलला जाणार आहे. (BCCI to give Rs 50 crore each to upgrade 10 stadiums where ODI World Cup matches will be played)
महत्वाच्या बातम्या –
एमपीएल अंतिम सामना पाण्यात! शुक्रवारी सकाळी रंगणार निकाली लढत
ऍशेस ट्रॉफी जिंकणे ऑस्ट्रेलियासाठी आता कठीण! लॉर्ड्सवर प्रमुख खेळाडूला दुखापत