भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 11 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीसाठी नवीन नियम आणला आहे. ‘प्रभाव खेळाडू नियम’ हा नवा नियम बीसीसीआयने बनवला आहे. हा नियम आगामी आयपीएल 2023 हंगामातही लागू केला जाऊ शकतो. या नियमाअंतर्गत, संघाला चालू सामन्यात त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्याही एका खेळाडूला बदलता येऊ शकते. संघ आणि खेळाडूंना या नियमाची सवय व्हावी यासाठी बोर्डाने आयपीएलपूर्वी राज्य क्रिकेटमध्ये हा नियम लागू केला आहे.
सर्व राज्य संघटनांना पाठवलेल्या परिपत्रकात बीसीसीआयने लिहिले आहे की, “टी20 क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेला पाहता हे गरजेचे आहे की, आम्ही नवीन नियम आणण्यावर विचार करावा. जेणेकरून क्रिकेटचे हे स्वरूप फक्त दर्शकांसाठी नव्हे तर खेळाडू आणि संघांनाही अधिक रोमांचक वाटेल.”
बोर्डानुसार, सामन्यादरम्यान संघ प्रभाव खेळाडू नियमानुसार (Impact Player Rule) एका खेळाडूला सब्स्टीट्यूट म्हणून संघात आणू शकतात. यामुळे खेळाला एक नवीन रणनीतिक आणि धोरणात्मक परिमाण मिळेल. परिपत्रकात या नियमाबद्दल सविस्तर सांगितले गेले आहे की, “संघांना नाणेफेकीवेळी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर करतानाच 4 सब्स्टीट्यूटची नावे द्यावी लागतील. संघाच्या यादीत सहभागी या 4 सब्स्टीट्यूटपैकी (Substitute Impact Player Rule) एका खेळाडूला प्रभाव खेळाडू नियमाअंतर्गत वापरले जाऊ शकते.”
सविस्तरपणे जाणून घ्या ‘प्रभाव खेळाडू नियम’
नाणेफेकीवेळी प्लेइंग इलेव्हनबरोबर कर्णधाराला 4 अशा खेळाडूंची नावे द्यावी लागतील, ज्यांपैकी एकाला तो सामन्यादरम्यान वापरू शकतो. या 4 पैकी फक्त एका खेळाडूला सब्स्टीट्यूट म्हणून वापरण्याचे बंधन आहे. जर संघ प्रथम फलंदाजी करताना झटपट आपल्या विकेट्स गमावत असेल, तर प्रभाव खेळाडू नियमाअंतर्गत ते प्लेइंग इलेव्हनमधील एखाद्या गोलंदाजाच्या (तळातील फलंदाज) जागी अतिरिक्त फलंदाज वापरू शकतात.
दुसरीकडे प्रथम फलंदाजी करताना जर संघाने जास्त विकेट्स गमावल्या नाहीत, तर दुसऱ्या डावात संघ एका फलंदाजाच्या जागी अतिरिक्त गोलंदाजाला सहभागी करू शकतो. मात्र सब्स्टीट्यूट खेळाडू आल्यानंतर त्याच्याजागी मैदान सोडावे लागणारा खेळाडू पुन्हा मैदानात उतरू शकत नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अंगावर काटा आणणारी घटना! इंग्लंडच्या क्रिकेटरचे कुटुंबीय सापडले व्हेलच्या तावडीत, मग..
बापरे! दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्सनी भरलेल्या विमानाचे इंजिन फेल, मोठा अपघात…
सॅमसन तयार करणार हार्दिक पंड्याला टक्कर देणारा अष्टपैलू! भारत अ संघात लागली वर्णी