युएई मध्ये खेळल्या जात असलेल्या महिला टी20 विश्वचषक 2024 मधील चार उपांत्य फेरीतील संघ निश्चित झाले आहेत. परंतु टीम इंडियाला अंतिम-4 मध्ये स्थान मिळू न शकल्याने भारतीय चाहते निराश झाले आहेत. भारताचा प्रवास साखळी फेरीतच संपला. खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे चाहते सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका करत आहेत. तर कर्णधार हरमनप्रीत कौरही निशाण्यावर असून तिला पदावरून हटवण्याची मागणी केली जात आहे. आता बीसीसीआयही कारवाईच्या तयारीत आहे. बीसीसीआय लवकरच कर्णधार म्हणून हरमनप्रीतच्या भविष्याबाबत निर्णय घेऊ शकतो. याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.
महिला टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाकडून खूप अपेक्षा होत्या पण चाहत्यांना निराशेचा सामना करावा लागला. अ गटात समाविष्ट असलेल्या भारताला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाची किंमत चुकवावी लागली. संघाला 2016 नंतर प्रथमच ग्रुप स्टेजमधून बाहेर पडावे लागले. यापूर्वी, भारतीय संघ 2018 आणि 2023 मध्ये उपांत्य फेरीत पोहोचला होता आणि 2020 मध्ये उपविजेताही ठरला होता.
मिताली राजच्या निवृत्तीनंतर हरमनप्रीत कौरला तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे कर्णधारपद देण्यात आले. तिने खूप पूर्वी टी20 ची कमान हाती घेतली. काैरने 2018 साली कर्णधार म्हणून टी20 विश्वचषकात आपला प्रवास सुरू केला. मात्र, आता तिच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, भारतीय संघाला नवीन कर्णधाराची गरज आहे की नाही हे बीसीसीआय ठरवणार आहे. त्यासाठी निवड समिती आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मजुमदार यांच्यासोबत लवकरच बैठक घेणार आहे.
नवीन कर्णधाराची नियुक्ती करायची की नाही यावर बीसीसीआय नक्कीच चर्चा करेल. असे सूत्राने सांगितले. भारतीय बोर्डाने संघाला हवे असलेले सर्व काही दिले आहे. हरमनप्रीत संघाची महत्त्वाची सदस्य राहील पण आता बदल करण्याची वेळ आली आहे. असे बीसीसीआयला वाटते.
हेही वाचा-
‘दोघांची नावे…’- विराट कोहली-बाबर आझमच्या तुलनेवर भारतीय दिग्गज संतापला!
टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील सर्व संघ निश्चित, जाणून घ्या सुपर-4 चे संपूर्ण वेळापत्रक
IPL 2025; मेगा लिलावापूर्वीच CSKच्या खेळाडूनं केलं रोहितचं कौतुक! म्हणाला, “रोहित भाई…”