सोमवारी (११ जानेवारी) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनीच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्याच्या पहिल्या डावात आघाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या डावात भारतापुढे ४०७ धावांचे तगडे आव्हान उभारले होते. परंतु रिषभ पंत व चेतेश्वर पुजारा यांच्या शतकी भागिदारी आणि आर अश्विन व हनुमा विहारी यांच्या चिवट झुंजीमुळे सामना अनिर्णीत राखण्यात भारताला यश आले.
परंतु बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजी शुक्ला यांना या मधळ्या फळीतील फलंदाजांचे प्रदर्शन खटकले आहे. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे त्यांनी भारतीय संघाच्या मधळ्या फळीतील फलंदाजांवर खोचक टीका केली आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत त्यांनी लिहिले की, “खरे तर भारतीय संघाच्या मधळ्या फळीतील फलंदाजांची अजून चांगली कामगिरी करायला हवी होती. जेणेकरुन आपण सामना तरी जिंकलो असतो.” अर्थात अप्रत्यक्षपणे त्यांनी भारतीय कसोटीपटू हनुमा विहारी आणि आर अश्विन यांच्यावर टीका केली.
यानंतर भारतीय क्रिकेट रसिकांनी शुक्ला यांना धारेवर धरले. एका रसिकाने ‘राजकारणी लोकांनी क्रिकेटपासून दूरच राहावे’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी ‘एवढेच असेल तर, शुक्लाजी तुम्हीच ब्रिस्बेनमध्ये येऊन कसोटी सामना खेळा ना’, असे म्हटले आहे. तसेच काहींनी शुक्ला यांच्या ट्विटवरुन त्यांना क्रिकेटविषयी काहीही समजत नसल्याचे तर्क-वितर्क लावले आहेत.
Actually the middle order could have performed little better and we would have won the match. @BCCI
— Rajeev Shukla (@ShuklaRajiv) January 11, 2021
Outrageous comment, when while India is appreciating the grit and resilience shown by the players. Yes there was a chance for India to win, if Pujara batted for 10 more overs, Pant batted for 30 more mins, Vihari dint Injure is Hamstring. Above all, could’ve been all out rushing
— rakesh allamneni (@AllamneniRakesh) January 11, 2021
Haan, aap hi khel lo Brisbane mein Shukla ji!
— Pawan Singh (@pawan_s26) January 11, 2021
NOT agree with above
— SUNNY 💙 (@UniversalSunny) January 11, 2021
Now it shows you never played the game
— CricketLife (@Bhupi3920) January 11, 2021
Rajivji you can’t be serious. This is the best we have seen them perform in a long time.
— Boria Majumdar (@BoriaMajumdar) January 11, 2021
Another reason politicians should stay away from cricket! Don't understand the reading of the beautiful game but don't want to leave the #BCCI for obvious reasons!! #AapRehnedoSirji
Concentrate on politics and INC. https://t.co/0T32o94jkW— vinit shah (@vinitshah_93) January 11, 2021
https://twitter.com/KshitizTiwari17/status/1348550309342138370?s=20
भारतीय संघाची चिवट झुंज
तिसऱ्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी भारतासमोर ३०९ धावा करण्याचे आव्हान होते. तसेच भारतीय संघाच्या हातात केवळ ८ विकेट्स बाकी होत्या. त्यातही रविंद्र जडेजाचा अंगठा फ्रॅक्चर असल्याने तो फलंदाजी करण्याची शक्यता कमी होती. अशा परिस्थितीत पाचव्या दिवशीच्या सुरुवातीलाच कर्णधार अजिंक्य रहाणेची विकेट गेल्याने अनेकांना हा सामना भारताच्या हातून निसटला, असे वाटत होते.
मात्र, भारतीय संघाकडून रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराने चौथ्या विकेटसाठी दमदार शतकी भागीदारी उभारली. या दोघांनीही १४८ धावांची भागीदारी करताला भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पण पंत ९७ धावांची तुफानी खेळी करुन तर पुजारा ७७ धावांची खेळी करुन दुसऱ्या सत्रात बाद झाले.
त्यातही पंत आणि पुजारा बाद झाल्यानंतर खेळणाऱ्या आर अश्विन आणि हनुमा विहारी जोडीसमोर नवीन समस्या आली ती दुखापतीची. फलंदाजी करत असतानाच विहारीला हॅमस्ट्रिंगचा त्रास व्हायला लागला. त्यामुळे त्याने मैदानावर उपचार घेतले आणि लढावू वृत्ती दाखवत खेळणे कायम केले. अश्विन आणि विहारी या जोडीने शेवटपर्यंत झुंज दिली आणि २५० पेक्षाही अधिक चेंडू म्हणजेच जवळपास ६३ षटके खेळत नाबाद अर्धशतकी भागीदारी केली. याबरोबरच त्यांनी हा सामना अनिर्णित राखत भारताचे या मालिकेतील आव्हान कायम ठेवले.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलियालाही दुखापतीचा फटका! चौथ्या कसोटीत ‘या’ खेळाडूच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह
चुकीसाठी माफी मागतो! अश्विनला स्लेजिंग केल्यानंतर टीम पेनला झाली उपरती