भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत मागच्या काही महिन्यांपासून संघातून बाहेर आहे. 2022च्या शेवटच्या आठवड्यात पंतचा कार अपघात झाला, ज्यामध्ये भारतीय क्रिकेटपटूला गंभीर दुखापत झाली होती. पण, पंत या दुखापतीतून अपेक्षेपेक्षा वेगाने सावरत आहे. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये पंतमध्ये होत असलेली सुधारणा स्पष्टपणे दिसून येते. त्यानंतर आता बीसीसीआयच्या अपेक्षा वाढल्या असून, रिषभला बरा करण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत.
पंत दुखापतीमुळे आता सहा महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. जीवघेण्या अपघातातून वाचल्यानंतर त्याच्या गुडघ्याचे लिगामेंट तुटले होते. त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) बेंगलोर येथे आहे. ट्रेनर रजनीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली तो आपला फिटनेस सिद्ध करतोय. रजनीकांत यांनी हार्दिक पंड्या व जसप्रीत बुमराह यांना दुखापतीतून बरे होण्यास मदत केली होती.
बीसीसीआय पंत आगामी वनडे विश्वचषकापर्यंत बरा होईल अशी अपेक्षा करत होती. मात्र, कितीही प्रयत्न केले तरी तो या वर्षभरात मैदानात उतरू शकणार नाही असे सांगण्यात आले आहे. तरीही, बीसीसीआयच्या एकूण कार्यक्रमावर जवळून नजर ठेवून असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, डिसेंबर 2022चा शेवटच्या आठवडा भारतीय क्रिकेटसाठी खूपच वाईट ठरला. 30 डिसेंबर रोजी रिषभ पंत दिल्लीवरून आपल्या घरी रुडकीला चालला होता. पहाटेच्या वेळी पंत स्वतः गाडी चालवत घरी निघाला होता. माहितीनुसार तो आपल्या आईला नवीन वर्षाची भेट म्हणून भेटण्यासाठी निघाला होता. पण वाटेतच त्याचा अपघात झाला. अपघातात पंतची गाडी जळून खाक झाली. पण सुदैवाने गाडी पेट घेण्याआधीच पंत त्यातून बाहेर पडला होता.
(BCCI Want Rishabh Pant Speedy Recovery In NCA)
महत्वाच्या बातम्या-
रैनासोबत घाणेरडी चेष्टा! LPLसाठी केली नव्हती नोंदणी, तरीही लिलावात आलं नाव; पण…
‘वनडे विश्वचषकात टॉप-4मध्ये पोहोचणार पाकिस्तान’, दिग्गजाचा मोठा दावा