2024 मध्ये भारतीय संघाला न्यूझीलंडविरूद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत 3-0 असा पराभव पत्करावा लागला. अशाप्रकारे, भारतीय संघाने जवळजवळ 12 वर्षांनी घरच्या भूमीवर कसोटी मालिका गमावली. त्याच वेळी, भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) 10 वर्षांनी गमावली. दरम्यान भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंवर सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) वाईटरित्या अपयशी ठरले. या दोन्ही दिग्गजांच्या कसोटी कारकिर्दीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. माजी दिग्गजांनी देखील या खेळाडूंवर टिकास्त्र सोडले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीला (Virat Kohli) बीसीसीआयकडून (BCCI) इशारा मिळाला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, जर विराट कोहली रणजी ट्रॉफीचा भाग नसेल तर त्याला इंग्लंड कसोटी मालिकेतून वगळले जाऊ शकते. खरेतर बीसीसीआयला विराट कोहलीने रणजी ट्रॉफीमध्ये त्याची भूक आणि समर्पण दाखवावे असे वाटते, परंतु जर तो तसे करण्यात अयशस्वी झाला तर त्याला इंग्लंड कसोटी मालिकेतून वगळले जाऊ शकते. रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीसमोर सौराष्ट्राचे आव्हान असेल. त्यामुळे असे मानले जाते की, विराट कोहली सौराष्ट्रविरूद्ध मैदानात उतरू शकतो.
आता 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी (19 फेब्रुवारी) पासून सुरू होत आहे. शुभारंभ सामन्यातच पाकिस्तान-न्यूझीलंड संघ आमने-सामने असणार आहेत. त्याच वेळी, भारतीय संघ (20 फेब्रुवारी) बांगलादेशविरूद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. खरेतर, पाकिस्तानकडे या स्पर्धेचे यजमानपद आहे, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही. त्यामुळे, भारतीय संघ हायब्रिड मॉडेल अंतर्गत आपले सामने दुबईमध्ये खेळेल.
महत्त्वाच्या बातम्या-
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी कधी होणार भारतीय संघाची घोषणा? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
महान सचिन तेंडुलकर झाला ‘या’ खेळाडूचा चाहता..! म्हणाला…
भारतीय संघात पुनरागमन करणार करुण नायर? म्हणाला, “माझी निवड होईपर्यंत…”