गेली २ वर्षे कोरोनामुळे सर्वच काही ठप्प पडले होते. याचा परिणाम क्रिकेटवरही झाल्याचे दिसून आले होते. परंतु हळूहळू आता सर्व सुरू होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली असली तरीही देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांना मात्र सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना चालना देण्यासाठी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह आणि खजिनदार अरुण धुमाळ यांनी मुंबईत दोन दिवस चाललेल्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला आहे. लवकरच देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या मानधनात वाढ केली जाणार आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एक प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ज्यामध्ये म्हटले गेले आहे की, ज्या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये २० पेक्षा अधिक सामने खेळले आहेत. त्यांना यापूर्वी ३५ हजार रुपये प्रति दिवस दिले जायचे. आता त्यांना ६० हजार रुपये प्रति दिवस दिले जाणार आहेत. तसेच ज्या खेळाडूंनी २० पेक्षा कमी सामने खेळले आहेत. त्या खेळाडूंना एका दिवसाचे ४५ हजार रुपये दिले जाणार आहेत. हे पहिल्यांदाच असे होणार आहे, जिथे देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या पुरुष क्रिकेटपटूंना एका सामन्याच्या आधारे मानधन दिले जाईल. (Bcci will increase domestics players match fee upto 90 percent)
तसेच पुढे म्हटले आहे की, ‘यामुळे खेळाडूंना खूप फायदा होणार आहे. या प्रस्तावावर लवकरच शिक्कमोर्तब करण्यात येऊ शकतो. आता सध्या पुरुष क्रिकेटपटूंना दर दिवसाचे ३५ हजार रुपये दिले जात आहेत. आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वी ज्या खेळाडूंनी १८ सामने खेळले आहेत, त्यांचे सामने पूर्ण होताच त्यांना प्रति दिवस ६०,००० रुपये मानधन दिले जाणार आहे.’
काही दिवसांपूर्वी भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या जयदेव उनाडकटनेही मागणी केली होती की, देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंसोबत देखील वार्षिक करार करण्यात यावा जेणेकरून खेळाडूंना ठरलेली रक्कम मिळेल.
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! इंग्लंडमधील क्रिकेट स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव, इथेच रंगणार आहे भारत-इंग्लंड कसोटी मालिका
सहकाऱ्याकडून कोहलीची स्तुती; म्हणे, ‘इतर खेळाडू १०० टक्के देतात, पण तो २०० टक्केच्या प्रयत्नात असतो’
विश्वविजेता भारतीय शिलेदार उतरणार ‘या’ परदेशी लीगच्या मैदानात, केलं रजिस्ट्रेशन